वाळकी च्या प्राथमिक शिक्षकांने केला ९ वर्षाच्या मुलीबरोबर अश्लील चाळे
नगर तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद सानप यांनी त्याला तात्काळ अटक केली.
अहमदनगर प्रतिनिधी – नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील वाळकी या गावाततील प्राथमिक शाळेमधील आरोपी नामे संतोष एकनाथ मोघाडे हा धोंडेवाडी प्राथमिक शाळा, मूळ गाव मांजरी,तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद सध्या राहणार आदर्श नगर विद्या कॉलनी कल्याण रोड अहमदनगर येथील असून…..
सविस्तर असे की आरोपी हा जिल्हा प्राथमिक शाळा धोंडेवाडी वाळकी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होता.इयत्ता चौथीत चौथीच्या वर्गातील विद्यार्थिनी व मैत्रिणी यांना शाळेमध्ये वर्गात एकएकीला बोलावून घेऊन या नराधमाने हात पाय चोपायला लावून अश्लील चाळे केल्याची माहिती मिळताच,नगर तालुका पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप पोलीस उपनिरीक्षक डी.आर जरावाल पोलीस हवालदार लबडे यांनी या शिक्षकाला तत्काळ अटक केली.
त्याच्यावरती गुरव नंबर कलम 15 34/2021 भा.द.वि.कलम 354 (अ) बाल लैंगिक अपघात पासून मालकाचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 11,12 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे
या नराधमाने वाळकी येथील धोंडेवाडी प्राथमिक शिक्षक ‘संतोष एकनाथ माघाडे ‘याने शाळेतील विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्या प्रकरणी त्याच्यावरती आज नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ बेड्या ठोकण्यात आल्या.
त्याने मागील बऱ्याच दिवसापासून बऱ्याच मुलीशी अश्लील चाळे व गैरवर्तन केल्याचे यावेळी सांगितले जात आहे
पुढील तपास नगर तालुका पोलीस सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी.आर जरावाल करीत आहेत.