वासन टोयोटात शुक्रवारी होणार ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसरचे अनावरण

- Advertisement -

वासन टोयोटात शुक्रवारी होणार ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसरचे अनावरण

सर्वांना परवडेल अशा किंमतीत एसयुव्ही श्रेणीतील कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्राहकांचा विश्‍वास संपादन करण्यात जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या टोयोटा किर्लोस्कर कंपनीने सर्वांना परवडेल अशा किंमतीत लॉन्च केलेल्या एसयुव्ही श्रेणीतील ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसर चे अनावरण केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट, नगर-पुणे रोड येथील वासन टोयोटा शोरुममध्ये शुक्रवारी (दि.24 मे) सकाळी 11 वाजता होणार आहे.

आमदार संग्राम जगताप व मा.आ. अरुणकाका जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसरचे अनावरण होणार असून, कारप्रेमी व टोयोटाच्या ग्राहकांना उपस्थित राहण्याचे आवाहन शोरुमचे संचालक जनक आहुजा यांनी केले आहे.

टोयोटा किर्लोस्कर कंपनी ग्राहकांच्या मनात असणाऱ्या वेगवेगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याकरिता नेहमीच प्रयत्नशील असते. एसयुव्ही श्रेणीतील ग्राहकांचा कल ओळखून कंपनीने 3 नुकतेच ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसर लॉन्च केली आहे. जी भारतातील त्याच्या मजबूत आणि संपूर्ण श्रेणीतील विविध गुणवैशिष्टये असलेल्या एसयुव्ही लाईनअप मध्ये गतिशील जोड आहे. बाजारपेठेत ही नवीन कार दाखल करुन कंपनीने एसयूव्ही सेगमेंट मध्ये पुन्हा प्रवेश झाल्याचे चिन्हांकित करून ग्राहकांना आधुनिक शैली, अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे प्रतिष्ठेची भावना प्रदान केली आहे. भारतीय ग्राहकांसाठी कंपनीचे हे नवीन उत्पादन एसयूव्ही श्रेणीतील प्रमुख उपस्थितीला आणखी मजबूत करते.

ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसर 1.0 लिटर टर्बो, 1.2 लिटर पेट्रोल आणि ई सीएनजी पर्यायमध्ये उपलब्ध आहे. 1.0 लिटर टर्बो 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये उपलब्ध आहे. अशा प्रकारे पॉवर आणि परफॉर्मन्स या दोन्ही गोष्टींना प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांसाठी एक अष्टपैलू पर्याय उपलब्ध आहे. 1.2 लिटर पेट्रोल, हायस्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि इंटेलिजंट गिअरशिफ्ट (आयजीएस) मध्ये येते. तर 1.2 लिटर ई सिएनजी 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे.

ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसर 1.0 लिटर टर्बो पर्यायामध्ये 100.06 पीएस 5500 आरपीएम ची कमाल पॉवर वितरित करते. मॅन्युअल साठी 21.5 किलोमीटर प्रति लिटर आणि ऑटोमॅटिक साठी 22.0 किलोमीटर प्रति लिटर या श्रेणीतील सर्वोत्तम इंधन कार्यक्षमतेसह पावर पॅक्ड ड्रायव्हिंग अनुभव देते. 1.2 लिटर पेट्रोल इंजन 21.7 मॅन्युअल आणि 22.8 (एमटी) प्रति किलोमीटरच्या इंधन कार्यक्षमतेसह एकूण 89.73 पीएस 6000 आरपीएम ची कमाल पावर देते. तसेच 28.5 प्रति केजी किलोमीटरची इंधन कार्यक्षमता ऑफर करणाऱ्या ई सीएनजी पर्यायमध्ये देखील उपलब्ध असल्याचे शोरुमच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. कारच्या अनावरणनंतर ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसर पाहण्यासाठी व टेस्ट ड्राईव्हसाठी शोरुममध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती अनिश आहुजा यांनी दिली.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!