टेस्ट ड्राईव्ह उपक्रमात सहभागी होण्याचे कारप्रेमींना आवाहन
कोरोनानंतर चारचाकी वाहन विक्रीत तेजी
दसरा-दिवाळीला वाहन खरेदीसाठी बुकिंगला ग्राहकांचा प्रतिसाद
अहमदनगर प्रतिनिधी – केडगाव येथील वासन टोयोटा शोरुममध्ये सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर टेस्ट ड्राईव्ह उपक्रमात सहभागी झालेल्यांची सोडत काढून यामधील भाग्यवान विजेत्यांची नांवे जाहीर करण्यात आले.
सप्टेंबर महिन्याच्या टेस्ट ड्राईव्ह उपक्रमात कारप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोरोनानंतर चारचाकी वाहन विक्रीत ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, दसरा-दिवाळीच्या मुहुर्तावर वाहन खरेदीसाठी वासन टोयोटोमध्ये बुकिंगला ग्राहकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॉ.सी.एस. पाटील, लष्करातील अधिकारी भगत जाधव यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली.
यावेळी शोरुमचे जनक आहुजा, अनिश आहुजा, प्रविण जोशी, रविंद्र थोरात, कुलदिप भटियानी, कविता बरकसे, प्राची देवळालीकर, प्रविण शिंदे आदी उपस्थित होते. सोडतीमध्ये प्रथम बक्षिस (मिक्सर, इस्त्री) प्रशांत चौरे (केडगाव), द्वितीय बक्षिस (डिनर सेट) सतीश वारे (पाईपलाइन रोड), तृतीय बक्षिस (इंडक्शन) अमोल डोईफोडे (तीसगाव, पाथर्डी) यांना मिळाले आहे.
विक्री पश्चात उत्तम सेवा देण्यास अग्रणी असलेले वासन टोयोटा शोरुममध्ये ग्राहकांच्या सेवेसाठी सतत नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असते. टोयोटा ग्लान्झा ही मॅन्यूअल व अॅटोमॅटीक 1.2 लीटर पेट्रोल इंजन हॅचबॅक आणि अर्बन क्रुझर मॅन्यूअल व अॅटोमॅटीक 1.5 लीटर पेट्रोल इंजिन एसयूव्ही श्रेणीत उपलब्ध आहेत. या दोन वाहनांची टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि भेटवस्तू मिळवा हा उपक्रम शोरुममध्ये सुरु आहे.
टेस्ट ड्राईव्ह उपक्रमात वाहन घेणारे, बुकिंग करणारे व गाडी न घेता फक्त टेस्ट ड्राईव्हसाठी आलेल्या ग्राहकांच्या नावांची सोडत काढून त्यांना बक्षिसे दिले जात आहे.
सदर उपक्रम ऑगस्ट ते ऑक्टोंबर पर्यंत चालणार आहे. या उपक्रमातंर्गत ग्राहकांना वाहनांची वैशिष्ट्ये, तीन वर्षे किंवा एक लाख किलो मीटरची वॉरंटी, सर्वात कमी सर्विसिंग खर्च, तीन वर्षे मोफत रोडसाइड (असिस्टन्स), मेन्टेन्स खर्च कमी करण्यासाठी वाहनांची काळजी, उत्तम मायलेजसाठी वाहन चालविण्याच्या पद्धती, इतर सुविधा व सेवांची संपूर्ण माहिती दिली जात आहे.
नवीन वाहन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर एकदा नक्की वासन टोयोटा शोरुमला भेट देऊन माहिती घ्यावी व टेस्ट ड्राईव्ह उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन शोरुमचे जनक आहुजा यांनी केले आहे.