विखे पाटील परिचारिका महाविद्यालयात नवजात शिशूच्या काळजीसाठी रंगले परिसंवाद
परिचारिकांनी जाणली नवजात शिशूच्या काळजीची भूमिका
अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील परिचारिका महाविद्यालयामध्ये सोसायटी ऑफ मिडवाइव्हज इंडिया (सोमि) आणि हिमालय वेलनेस कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने नवजात शिशूची आवश्यक काळजी या विषयावर परिसंवादाचे (सिमपोझियम) आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाला परिचारिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
परिसंवादाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. फाऊंडेशनचे संचालक डॉ. अभिजित दिवटे (वैद्यकीय) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी सोमिच्या सल्लागार श्रीमती मनोन्मनी व्यंकट, सरचिटणीस (सोमि) रोहिणी नगरे, महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा मंगला जोशी, हिमालय वेलनेस कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक अरिंदम कुंडू आदी उपस्थित होते.
या परिसंवादात जिल्हा रुग्णालयाचे पी.एच.एन. संदीप काळे यांनी परिचारिकांच्या नवजात काळजीचा प्रभाव आणि गरज यावर मार्गदर्शन केले. स्त्रीरोग तज्ञ डॉ. उर्मिला शिंदे यांनी नवजात शिशूची आवश्यक काळजीमध्ये परिचारिकेची भूमिका आणि बालरोग तज्ञ डॉ. सूचित तांबोळी यांनी आवश्यक नवजात शिशूच्या काळजीचे महत्त्व आणि आव्हाने या विषयावर व्याख्यान दिले.
या परिसंवादासाठी 136 परिचारिका सहभागी झाल्या होत्या. सरचिटणीस श्रीमती रोहिणी नगरे यांनी सोमि संघटनेची कार्यकारणी स्पष्ट केली. मंगला जोशी यांनी परिचारिकेने सोमि संघटनेमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. श्रीमती मनोन्मनी व्यंकट यांनी राष्ट्रीय सोमि मुख्यालयातर्फे शुभेच्छ्या दिल्या.
कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये सोसायटी ऑफ मिडवाइव्हज इंडिया च्या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सोसायटी ऑफ मिडवाइव्हज इंडिया अहमदनगर शाखेची स्थापना करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रतिभा चांदेकर यांनी सर्व मान्यवरांचे विशेषतः सोसायटी ऑफ मिडवाइव्हज इंडिया, हिमालय वेलनेस कंपनी, परिसंवादासाठी लाभलेल्या सर्व व्याख्यात्यांचे व परिचारिकांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये उपप्राचार्य डॉ. योगिता औताडे, असि प्रोफेसर कविता भोकनळ, सलोमी तेल्धुने, मनीष तडके, मोहिनी सोनवणे, विनसी विल्सन, क्लिनिकल प्रशिक्षक विद्या कुऱ्हे, प्रशिक्षक रीबिका साळवे यांनी परिश्रम घेतले. हिमालय वेलनेस कंपनीच्या प्रादेशिक व्यवस्थापक अरिंदम कुंडू यांने सर्व परिचारिकांना हिमालय कंपनीचे भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या.