विश्वास सार्थ ठरवू – गाडेकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या नगर दक्षिण लोकसभा अंतर्गत शेवगाव-पाथर्डी विधानसभा निवडणूक प्रमुखपदी विद्याताई गाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. आघाडीचे राज्य प्रमुख तुषार भोसले यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रमुख मयूर जोशी यांनी गाडेकर यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र दिले.
श्रीमती गाडेकर या भारतीय जनता पार्टीच्या एकनिष्ठ सक्रिय कार्यकर्त्या असून, त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. एक उत्तम संघटक म्हणून त्या योगदान देत आहे. त्यांच्या पक्षातील योगदान व कार्याची दखल घेऊन त्यांच्याकडे लोकसभा अंतर्गत विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गाडेकर यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या नगर दक्षिण लोकसभा अंतर्गत शेवगाव – पाथर्डी विधानसभा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करून पक्ष नेतृत्वाने मोठा विश्वास टाकला आहे. त्यानुषंगाने समर्पक काम करून पक्ष नेतृत्वाचा हा विश्वास निश्चितच सार्थ ठरविणार असल्याची भावना विद्याताई गाडेकर यांनी व्यक्त केली.