विद्युत महावितरण कार्यालयात शेवगाव-पाथर्डीच्या शेतकर्‍यांचे धरणे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

शेतकर्‍यांचे वीज बिलापोटी अचानकपणे बंद करण्यात आलेला विद्युत पुरवठा सुरु करण्याची मागणी

पाण्याअभावी पिकांचे नुकसान

अधिकार्‍यांपुढे शेतकर्‍यांनी वीजेसाठी अक्षरश: जोडले हात

 

अहमदनगर(प्रतिनिधी)- शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील शेतकर्‍यांचे वीज बिलापोटी अचानकपणे बंद करण्यात आलेला विद्युत पुरवठा त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी जनशक्ती विकास आघाडीच्या माध्यमातून स्थानिक शेतकर्‍यांनी विद्युत महावितरण कार्यालयात धरणे आंदोलन केले.

जनशक्तीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजीराव काकडे व जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनिल काकडे यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात जगन्नाथ गावडे, सुरेश चौधरी, दत्तात्रय पोटफाडे, राजेंद्र पोटफाडे, किसन झुंबड, मनोहर मडके, सुभाष आंधळे, विजय आंधळे, रामकिसन भडके, बाबूशा मडके, किशोर दहीफळे आदी शेतकरी सहभागी झाले होते.

महावितरण कार्यालया समोर निदर्शने करीत शेतकर्‍यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंताना घेराव घातला. सध्या थोडा अवकाळी पाऊस झाल्याने पिके टिकली असून, येत्या दोन तीन दिवसात पाणी न मिळाल्यास शेतीत लावलेल्या पिकांचे मोठे नुकसान होणार असल्याचे स्पष्ट करुन काही शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांपुढे विद्युत पुरवठा त्वरित सुरु करण्यासाठी अक्षरश: हात जोडली.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाने विविध वीज वसुलीचा मुद्दा घेऊन गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अचानकपणे शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील शेतकर्‍यांच्या शेती पंपाचा वीज पुरवठा बंद केला आहे.

यामुळे शेतकर्‍यांसमोर पिके जगविण्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.सध्या ग्रामीण भागांमध्ये पिकांना पाणी देण्याचे अत्यंत आवश्यकता भासत आहे. पिकांना पाणी न दिल्यास रब्बी हंगाम वाया जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पिके धोक्यात येत आहेत.

शेतकर्‍यांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे.शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो.शेतात लावलेल्या जनावरांच्या चार्‍याच्या पिकांना पाणी देण्याचा प्रश्‍न देखील निर्माण झाला असून,विद्युत महावितरणने शेतकर्‍यांचा विद्युत पुरवठा बंद करुन त्यांना मोठ्या अडचणीत आनले असल्याचे जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

महावितरणकडून दोन वीज बिलाची वसुली केली जात असून,अन्यथा शेतकर्‍यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे.यावर्षी शेतकरी कोरोना व अतिवृष्टीच्या संकटातून थोडा सावरत असून, त्याला महावितरणने सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी.सध्या शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने दोन बिले भरण्यास शेतकर्‍यांना शक्य होणार नाही.दोन बिलापोटी पाच हजार किंवा त्यापेक्षा जास्त भरणा येत आहे.

मात्र सर्वसामान्य शेतकरी प्रत्येकी तीन हजार रुपये भरण्यास तयार आहे.विद्युत महावितरणने तीन हजार रुपये भरण्याची सवलत दिल्यास शेतकरी ही रक्कम भरून सहकार्य करणार आहे.

यापुर्वी देखील वीज बिलाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यावेळी तीन हजार रुपये भरण्याचा निकष ठेवण्यात आला होता. त्याप्रमाणे शेतकर्‍यांना सवलत देण्याची व तातडीने बंद करण्यात आलेला विद्युत पुरवठा त्वरित सुरू करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.

—————————–
शेतकरी अनेक संकटांना सामोरे जात असून, त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. शेतकरी विद्युत महावितरणला तीन हजार रुपये भरण्यास तयार आहेत. शासनाने ताठर भूमिका न घेता दोन बिल भरण्याची अट न ठेवता शेतकर्‍यांना सहकार्य करण्याची गरज आहे. – अ‍ॅड. शिवाजीराव काकडे (संस्थापक अध्यक्ष, जनशक्ती विकास आघाडी)


आठ दिवसापासून शेतीला पाणी नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. विद्युत पुरवठा खंडित केल्याने पिकांना पाणी देण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सरसकट दोन बील भरा, शासनाचे हे धोरण चुकीचे असून, किमान रक्कम ठरवून ती रक्कम शेतकरी वर्ग भरण्यास तयार आहे. मोठे शेतकरी वीज बिल भरत नसल्याने त्यांच्यासह लहान शेतकरी वर्ग देखील भरडले जात आहे. – हर्षदा काकडे (जिल्हा परिषद सदस्या)
—————————–

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!