विधी सायन्स अकॅडेमीच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत उत्कर्ष शेटिया प्रथम

0
81

अहमदनगर प्रतिनिधी – डॉ.बाळासाहेब शिंदे सामाजिक संस्थेच्या विधी सायन्स अकॅडेमी च्या वतीने तालुकास्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती.या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला असून यात केडगाव येथील कार्मेल कॉन्वेंट शाळेचा नववीतील विद्यार्थी उत्कर्ष शेटिया याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

संस्थेचे सचिव प्रा.विजय शिंदे व कार्मेल कॉन्वेंट च्या उपप्राचार्य सिस्टर डेला यांच्या हस्ते नुकतेच वितरीत करण्यात आले. यावेळी शिक्षिका मंगल साबळे, हमीदा शेख उपस्थित होत्या.

शिंदे यांनी स्पर्धेचे स्वरूप समजावून सांगताना सांगितले कि यात तीन विषय देण्यात आले होते. कोरोना काळातील माझे दिवस आणि त्यातून घेतलेला धडा, माझे ध्येय आणि मी, तंत्रज्ञान वापर चांगला कि वाईट. उत्कर्ष ने कोरोना काळातील दिवस या विषयांवर अतिशय सकारात्मक अशा शब्दामध्ये व्यक्त केला आणि खूप चांगल्या गोष्टी याकाळात आत्मसात केल्या.

व्दितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक पायल गुंड व किर्ती दरेकर ज्ञानदीप विद्यालय वाळूंज यांचा आला असून भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल ची विद्यार्थिनी याज्ञा लांडगे हिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.प्रमाणपत्र पुष्प व रोख बक्षीस असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचा एकत्रित कार्यक्रम करणे शक्य नसल्याने त्या त्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले आहे.यासाठी कार्मेल कॉन्वेंट च्या प्राचार्य सिस्टर स्वरुप्या,ज्ञानदीप विद्या मंदिर चे प्राचार्य भाऊसाहेब रोहाकले,भाऊसाहेब फिरोदिया शाळेचे श्री दुगड सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. निबंध गुणांकन करण्यासाठी सौ. प्रिती व सागर वानखेडे यांनी मदत केली.

विधी सायन्स अकॅडेमी विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन करते त्यासाठी गुगल फॉर्म तयार केला असून ९५५२०४४५०९ या whats app नंबर वर मेसेज केला तर त्यांना देखील अकॅडेमी च्या वतीने परत संपर्क साधून संभाषण केले जाते.तरी जास्तीत जास्त पालकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन संचालिका सौ. वैशाली शिंदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here