विवाहित महिलेला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार कोतवालीत खुशाल ठक्कर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

0
84

अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख

विवाहित महिलेला लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी महिलेच्या इच्छेविरुध्द शारिरीक संबंध प्रस्थापित करुन अत्याचार केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशनला केडगाव येथील खुशाल ठारुमल ठक्कर या व्यक्तीविरोधात बलात्कार, फसवणुक व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव येथील विवाहित महिलेशी आरोपीचे नात्याचे संबंध होते. मात्र पिडीत महिलेचा नवरा व्यसनाधीन असल्याचा फायदा घेऊन आरोपीने फिर्यादी महिलेस लग्नाचे अमिष दाखवून तिला शहरातील अरणगाव रोडला राहण्यासाठी आनले. 22 एप्रिल 2019 ते 4 ऑक्टोबर 2021 पर्यंत अरणगाव येथील महिलेला तिच्या राहत्या घरी तिच्या इच्छेविरुध्द आरोपीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. महिलेने आरोपीस लग्नाची विचारणा केली असता, त्याने धमकावण्यास सुरुवात केली व जिवे मारण्याची धमकी दिली.

आरोपी खुशाल ठारुमल ठक्कर याने पिडीत महिलेला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर इच्छेविरुध्द संभोग केला असल्याचे पिडीत महिलेने फिर्यादीत म्हंटले आहे. यावरुन सोमवार दि. 11 ऑक्टोबर रोजी खुशाल ठारुमल ठक्कर यांच्या विरोधात कोतवाली पोलीस स्टेशनला कलम 376, 420, 506 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here