आरोग्य शिबीर,रक्तदान,महिलांसाठी व्याख्यान, वृक्षरोपण कार्यक्रमांचा समावेश
गरजूंसाठी लायन्सने समर्पित भावनेने सेवा दिली -संपुर्णा सावंत
अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख
लायन्स क्लब इंटरनॅशनल या जागतिक व सर्वात मोठ्या सामाजिक संस्थेच्या सेवा सप्ताहात लायन्स मिडटाऊनने योगदान दिले. शहरातील विविध गरजू घटकांना मदतीचा हात देऊन, वंचितांसह हा सप्ताह साजरा करण्यात आला. तसेचे विविध उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंसाठी लायन्सने समर्पित भावनेने सेवा दिल्याची भावना लायन्स मिडटाऊनच्या अध्यक्ष संपुर्णा सावंत यांनी व्यक्त केली.
या सेवा सप्ताह अंतर्गत मातोश्री वृद्धाश्रम येथे ज्येष्ठ नागरिकांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करुन त्यांच्यासाठी विविध सरकारी योजना पोहचविण्याच्या दृष्टीने व्याख्यान घेण्यात आले. तसेच वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांबरोबर गप्पा, मनोरंजनाचा कार्यक्रम रंगला होता. जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करुन २८ रक्ताच्या पिशव्या संकलित करण्यात आले.
रक्तदानासाठी डॉ. विक्रम पानसंबळ व श्रीनिवास बोज्जा यांचे सहकार्य लाभले. शिर्डी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम प्रांतपाल हेमंत नाईक व विभागीय अध्यक्ष संतोष संतोष माणकेश्वर यांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच महिलांचे समुपदेशन व संरक्षण या विषयावर डॉ. कल्पना ठुबे यांचे व्याख्यान तसेच स्मिता उकिर्डे यांचे योग व फिटनेस यावर प्रात्यक्षिकासह व्याखान पार पडले.
डॉ. संजीवनी कराळे यांचे महिलांचे आरोग्य व सौंदर्य या विषयावर विशेष च्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. आदिती पानसंबळ यांनी महिलांना विविध आहार व विहार यावर मार्गदर्शन केले.
अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येथे मोफत सर्वरोग निदान शिबिर घेण्यात आले. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या शिबीरात प्राचार्य डॉ. सुनील पवार, संस्थेचे अध्यक्ष डॉ. भूषण अनभुले, सचिव डॉ. डी.एस. पवार यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून कोरोनायोद्धा सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले.
गोरे डेंटल क्लिनिक येथे मोफत दंतरोग तपासणी व उपचार शिबीर घेण्यात आले. यामध्ये डॉ. सुदर्शन गोरे यांनी रुग्णांची तपासणी केली. या सेवाप्ताहात लायन्सच्या आम्ही सेवा देत आहो!, या घोषवाक्याला अनुसरुन लायन्स मिडटाऊनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
कोरोना महामारीतून समाजाला सावरण्यासाठी लायन्स मिडटाऊन सामाजिक योगदान देत असल्याचे सप्ताह प्रमुख प्रसाद मांढरे व सुनंदा तांबे यांनी स्पष्ट केले.
सेवा सप्ताहाचे विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्स मिडटाऊनच्या सचिव कल्पना ठुबे, खजिनदार स्मिता उकिर्डे, शारदा पवार, डॉ. विक्रम पानसंबळ, डॉ. आदिती पानसंबळ, लक्ष्मीकांत झंवर, सतीश झिकरे, संजय लुणिया, रवींद्र शितोळे, संजय मुनोत, सर्वोत्तम क्षीरसागर, शशिकला क्षीरसागर, रवींद्र सुपेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.