अहमदनगर प्रतिनिधी – विश्व हिंदु परिषद बजरंगदल क्षेत्र सह संयोजक तथा प्रांत सह मंत्री विवेकजी कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थित विश्वहिंदू परिषदेची जिल्हा बैठक संपन्न झाली.
या बैठकीत नूतन जिल्हाध्यक्षपदी अँड जय भोसले व मातृशक्ती जिल्हा संयोजिका पदी सौ.शारदाताई होशिंग,विश्वहिंदू परिषदेचे शहराध्यक्षपदी इंजिनिअर विजयकुमार पादीर यांची नियुक्तीची घोषणा करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे,जिल्हा सहमंत्री गौतम कराळे,कोषाध्यक्ष मुकुल गंधे,मठ मंदिर समितीचे प्रमुख हरिभाऊ डोळसे,प्रांत मीडिया प्रमुख अमोल भांबरकर,शहरमंत्री श्रीकांत नांदापूरकर,शहर कोषाध्यक्ष विशाल रायमोकर आदींसह जिल्हा व शहर पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आगामी काळात येणारे सण उत्सव याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.तसेच नवीन नियुक्ती झालेले पदाधिकारी यांचे सर्वानी अभिनंदन केले.
कोरोनाकाळात विश्व हिंदू परिषदेने केलेल्या मदत कार्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.