तारकपूर बस स्टॅन्ड समोरील हॉस्पिटल ने अतिक्रमण केल्याने वारंवार तक्रार अर्ज देउन देखिल कारवाई होत नसल्याचा आरोप करून कारवाई करण्याची मागणी.
आंदोलनाचा इशारा देता आयुक्तांची दांडी.
अहमदनगर (प्रतिनिधी)- तारकपुर तारकपूर बस स्टॅन्ड समोरील सिटी केअर हॉस्पिटल समोर महानगरपालिका हद्दीत असलेले झाडे तोडून त्या ठिकाणी बेकायदेशीर रित्या कंपाउंड चे बांधकाम चालू केले असून सदरील ठिकाणी रस्त्यावर अडथळा निर्माण होऊन ट्राफिक जाम होत असल्याने येथे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या गाड्या देखील रस्त्याच्या कडेला लागून रस्ता अरुंद झाला असल्याने या ठिकाणी अतिक्रमण विभाग प्रमुख यांनी पाहणी केली असून अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात आम्हाला आश्वासन दिले होते परंतु अतिक्रमण निघत नाही या निषेधार्थ महानगर पालिकेच्या आयुक्त यांच्या दालनात ठिय्या आंदोलन २७ ऑक्टोबर रोजी करण्याचे निवेदनात म्हटले होते.
त्या दिवशी आयुक्त नसल्यामुळे ठीया आंदोलन २८ ऑक्टोबरला करणार असल्याचे सांगून आंदोलन करते आले असून आयुक्तांनी पुन्हा दांडी मारली असल्यामुळे निषेध नोंदवून ठिया आंदोलन करण्यात आले. अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष नवेद शेख व शहर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उजागरे यांच्या नेतृत्वाखाली ठीया आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रदेश सचिव सय्यद शफी बाबा, जिल्हा अध्यक्ष अज्जु शेख, अल्पसंख्यक जिल्हा अध्यक्ष अल्ताफ शेख, शहर अल्पसंख्यक उपाध्यक्ष शाहनवाज शेख, उपाध्यक्ष अरुण कोंडके, शरीफ सय्यद, मुफ़्ती अल्ताफ मोमिन, जुबेर सय्यद, ललित कांबळे, साजिद पठान, सादिक सय्यद, मोहसिन शेख, सोहेल शेख, अजिम खान, रियाज शेख आदी उपस्थित होते.
सदरील सिटी केअर हॉस्पिटलने अतिक्रमण केलेले काढण्यात आले नाही त्यावर लवकरात लवकर कारवाई होण्यासाठी २९ ऑक्टोंबर रोजी पुन्हा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
- Advertisement -