सुलतानी कारभार न थांबसल्यास अधिकार्यांना कोंडणार – विक्रम राठोड
अहमदनगर प्रतिनिधी – नगर शहरातील वीज वितरण कंपनीचा कारभार गलथान,भ्रष्ट,तुघलकी आणि निष्पाप जीवांचे बळी घेणारा झाला आहे.कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी वीज बिल वसुलीच्या नावाखाली ग्राहकांचे वीज मीटर काढून नेऊन सुलतानी पद्धतीने वसुली करीत आहेत.
हा गैरकारभार न थांबल्यास शिवसेना वीज वितरण कंपनीच्या प्रत्येक सब स्टेशनच्या कार्यालयाचे वीज कनेक्शन तोडून आणि अधिकार्यांना कोंडून टाळे ठोकण्याचे आंदोलन आपल्या स्टाईलने करेल,अशा इशारा युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी दिला.
वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात निदर्शेने करुन अधिक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी विक्रम राठोड,माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते,माजी महापौर भगवान फुलसौंदर,अभिषेक कळमकर,उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव,नगरसेवक मदन आढाव,दत्ता जाधव,आकाश कातोरे,रवी वाकळे, आंबादास शिंदे,अरुण झेंडे,संदिप दातरंगे,अक्षय नागापुरे, विशाल गायकवाड,गुड्डू भालेराव महेश गलांडे आदि उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, शॉर्ट सर्किटमुळे नुकतीच चितळेरोड येथील दत्त बेकरीला भीषण आग लागली व मोठी वित्त हाती झाली. तसेच मध्यंतरी शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश गायकवाड यांचा २९ वर्षीय मुलाला त्याच्या राहत्या घरी विजेचा जबरदस्त धक्का बसून तो जागीच मृत्यूमुखी पडला.
त्याचप्रमाणे प्रोफेसर चौक येथे कमानीवर फ्लेक्स लावतांना लोखंडी कमानीत वीज प्रवाह उतरल्याने सौरभ चौरे याचा जीव गेला.मागिल महिन्यात पोलिस मुख्यालयात विजेचा शॉक लागून एका मुलीचा बळी गेला.
या सर्व घटनांना वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचार्यांचा गलथान कारभार जबाबदार आहे.चौकशीत सर्व सिद्ध होऊन देखील कोणावरच कारवाई होत नाही.या घटनांमध्ये जे मृत्यूमुखी पडले ते घरांच्याचा एकमेव आधार होते.त्यामुळे महावितरण कंपनीने त्यांना तात्काळ २५ लाखांची मदत करावी व दोषींवर कारवाई करुन त्यांना अटक होण्यासाठी पोलिस स्टेशनला पत्र द्यावे.
यासर्वांवर कहर म्हणजे माणुसकीला काळिमा फासणारी आहे.नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दिवाळीच्यावेळी शॉर्ट सर्किटमुळे आासीयू युनिटला आग लागली.त्या जळीत कांळात १४ निष्पापांचा बळी गेला.या घटनेला सर्वस्वी वीज वितरण कंपनीचा भ्रष्ट आणि गलनाथ कारभारच जबाबदार आहे हे चौकशी अंती सिद्ध झाले आहे.
वीज वितरण कंपनीने एक्सप्रेस फिडरद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात जे विजेचे कनेक्शन दिले ते सिंगल युजर असते.पण कायदा मोडून आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करुन कंपनीने भ्रष्ट जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पत्रावरुन नव्याने झालेल्या धर्मादाय स्वरुप असूनही खाजगी पद्धतीने चालवित असलेल्या कुप्रसिद्ध साईदीप हॉस्पिटलला यातून विजेची दुसरी जोडणी दिली.त्यामुळे या फिडरवर अतिरिक्त ताण आला व शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे आयसीयुला आग लागली.अवघ्या १० मिनिटांत होत्याचे नव्हते झाले.
राज्यासह केंद्राने या घटनेची दाखल घेतली चौकशी झाली, कारवाईचा अहवाल आला पण तो दडपण्यात आला.ज्या निष्पाप जीवाचा बळी गेला त्यांना कोणीच वाली उरले नाही का? ते पिडित कुटूंबिय न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. पण कारवाई शुन्य आहे. यासर्व घटनातील दोषी अधिकारी व कर्मचार्यांना निलंबित करुन त्यांची रवानगी तुरुंगात करावी,अशी मागणी करण्यात येत आहे.
सध्या कोरोनामुळे लॉकडाऊनची संकट सर्वांवर आहे.उद्योग धंदे बंद होत आहेत, हजारो कुटूंबाचे बेरोजगार झाले आहेत, अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीने लोकांना सरासरी वीज बिलाच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा बिले पाठवलीआहेत.त्याची वसुली पठाणी पद्धतीने करण्यात येत आहे.वीज बिल न भरल्यास किंवा ऑनलाईन भरले असले तरी त्यांची नोंद वीज वितरण कंपनीकडे होण्यास थोडा विलंब लागत असला तरी त्यासाठी न थांबता कर्मचारी वीज मीटर काढून ग्राहकांना संकटात टाकत आहेत.
महावितरणने अशाप्रकारे वसुली थांबवावी व माणुसकीच्या नात्याने ग्राहकांना वागणूक द्यावी,अशी मागणी करण्यात येत आहे,अन्यथा शिवसैनिक आपला हिसका दाखविल.तरी आपण निवेदनाचा सकारात्मक विचार करुन योग्य तो कारवाई करावी,अन्यथा येत्या सोमवारी अधिकार्यांना कोंडून टाळे ठोकण्याचे आंदोलन केले जाईल,असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी आंदोलकांनी वीज वितरण कंपनीच्या अधिक्षकांच्या दालनातच ठिय्या आंदोलन केले.