निमगाव वाघात रंगले कवी संमेलन व महिला बचट गट मेळावा
शालेय विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण
सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार
अहमदनगर प्रतिनिधी – त्याग केल्याशिवाय माणुस घडत नाही. व्यक्तीच्या त्यागावर त्याच्या उज्वल भवितव्याचा पाया रचला जात असल्याचे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले. तर समाजासाठी कार्य करणार्यांचा सन्मान झाला पाहिजे.आपल्या वेगळेपणाचे असतित्व सिध्द करुन ते समाजासाठी योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथील मिलन मंगल कार्यालयात आयोजित कवी संमेलन, महिला बचत गट मेळाव्याचे उद्घाटन तसेच विविध पुरस्कार व शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धेचे बक्षिस वितरण सोहळ्यात आमदार लंके बोलत होते.
जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी सिनेकलाकार राजू उर्फ मोहनीराज गटणे, प्रा.डॉ. शैलेंद्र भणगे, प्राचार्या गुंफाताई कोकाटे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, मुख्याध्यापक किसन वाबळे, सरपंच रुपाली जाधव, उपसरपंच अलका गायकवाड, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहाय्यक जिल्हा समन्वयक अधिकारी सुनिल पैठणे, गोकुळ जाधव, भागचंद जाधव, माजी सरपंच सुमन डोंगरे, भाऊसाहेब ठाणगे, उद्योजक दिलावर शेख, अरुण फलके, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, शिवाजी होळकर, वनकुटेचे सरपंच राहुल झावरे, सचिव प्रतिभा डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य किरण जाधव, प्रमोद जाधव, ज्ञानदेव कापसे, अतुल फलके, बापू फलके आदिंसह ग्रामस्थ व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
पुढे बोलताना आमदार लंके म्हणाले की, डोंगरे संस्थेच्या माध्यमातून युवकांना घडविण्याचे कार्य केले जात आहे. युवाशक्तीने बदल घडतात.सत्ता परिवर्तनाची ताकत युवकांमध्ये आहे.तरुण एकवटल्यानेच पारनेर मतदार संघात निवडून आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तर नेता, अभिनेत यावर मिश्कील टिप्पणी करत दोघांना प्रसिध्दीच्या झोतात रहावे लागत असल्याचे सांगताच सभागृहात हशा पिकली. तसेच व्यसनमुक्ती व पर्यावरण संवर्धन काळाची गरज असून, संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या व्यसनमुक्ती व पर्यावरण संवर्धनाच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
प्रास्ताविकात पै.नाना डोंगरे यांनी कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळण्यासाठी व व्यसनाच्या आहारी जाणार्या युवकांना रोखण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. निर्व्यसनी व निरोगी पिढी घडविण्यासाठी संस्थेच्या वतीने कार्य सुरु आहे. तसेच सामाजिक कार्य करणार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी झालेल्या कवी संमेलनात उपस्थित कवींनी सामाजिक विषयांवर कविता सादर केल्या. महिला सक्षमीकरणासाठी महिला बचतगटांना विविध व्यवसायासाठी लागणारे भांडवल बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यासंदर्भात महिला आर्थिक विकास महामंडळाचे सुनिल पैठणे यांनी मार्गदर्शन केले.
आमदार लंके यांनी कोरोना काळात कोविड सेंटर उभारुन गोर-गरीबांना आधार दिले, या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रात योगदान देणार्या विविध क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तींना स्वामी विवेकानंद युवा गौरव व राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरविण्यात आले.
तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महित्सवानिमित्त आयोजित फिट इंडिया फ्रिडम रन स्पर्धा,पं.दीनदयाल उपाध्याय जयंतीची मेगा रन स्पर्धा,मतदार जागृतीवर घेण्यात आलेल्या निबंध व पोस्टर स्पर्धा,अहिल्यादेवी होळकर जयंती व तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त ऑनलाईन निबंध स्पर्धा, गणेशोत्सवानिमित्त पर्यावरणावर घरगुती देखावा स्पर्धा, छत्रपती शाहू महाराज जयंती व अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त घेण्यात आलेली चित्रकला स्पर्धा, संभाजी महाराज जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेते ठरलेल्या शालेय विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.
माधवराव लामखडे म्हणाले की, नाना डोंगरे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरणावर वर्षभर कार्य करत आहे. आमदार निलेश लंके यांनी कोरोना काळात गोर-गरीबांसाठी कोविड सेंटर उभारुन मोठा आधार दिला. सामाजिक भान जपणार्या नेत्यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान होणे ही गौरवास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
तर दिवाळीनंतर निमगाव वाघात मोठा कुस्तीचा आखाडा घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले. मोहनीराज गटणे यांनी जीवनातील प्रत्येक क्षण हे स्पर्धेने भरलेले आहे.विद्यार्थ्यांनी आवड असलेल्या क्षेत्राच्या स्पर्धेत उतरावे व आत्मविश्वासाने त्यामध्ये पारंगत व्हावे.आपल्यातील गुणांचे दिखाव्याचे प्रदर्शन करण्यापेक्षा आहे त्या क्षमेतेचे दर्शन घडविण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उध्दव काळापहाड यांनी केले. आभार संदिप डोंगरे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाऊसाहेब डोंगरे, अमोल डोंगरे, रमेश शिंदे, बाबासाहेब महापुरे, संजय सावंत, किरण ठाणगे, विकास निकम, सुरेश खामकर, अतुल पुंड, मयुर काळे, किरण पवार यांनी परिश्रम घेतले.