- Advertisement -
शहरातील तृतीयपंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क
तृतीयपंथीयांनी एकत्र येऊन केले मतदान
अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाचा चौथा टप्पा पार पाडत असून, नगर शहरातील तृतीयपंथीयांनी एकत्र येत सोमवारी (दि.13 मे) मतदानाचा हक्क बजावला.
नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत असताना सर्व तृतीयपंथीयांनी एकत्र येत तारकपूर येथील सेंट सेव्हिअर स्कूल येथील मतदान केंद्रावर मतदान केले. शहरातील सर्व तृतीय पंथीयांचे 100 टक्के मतदान होण्यासाठी तृतीय पंथीयांचे अध्यक्ष काजल गुरु यांनी पुढाकार घेतला होता. मोठ्या प्रमाणात मतदानासाठी एकत्र आलेल्या तृतीयपंथीयांनी सर्वांचे लक्ष वेधले.
- Advertisement -