शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा होणार सुरळीत : उपमहापौर गणेश भोसले

0
98

विळद पंपिंग हाऊस येथे पाचव्या विद्युत पंपाची पाहणी करून केला शुभारंभ

अहमदनगर प्रतिनिधी : शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.याच बरोबर पाणीपुरवठा वितरणाच्या वेळेत बदल झाले आहे.रात्री-अपरात्री सुटणाऱ्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
वसंत टेकडी येथे अमृत पाणी योजनेची ५० लाख लिटर क्षमतेच्या टाकीची पाण्याची लेवल मिळत नसल्यामुळे संपूर्ण शहराचे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.यासाठी महापालिकेच्या वतीने विळद पंपिंग स्टेशन येथे पाचवा विद्युत पंप बसविण्यात आला आहे.त्यामुळे वसंत टेकडी येथील पाण्याच्या टाकीचे लेवल मिळणार असल्यामुळे शहरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.अशी माहिती उपमहापौर गणेश भोसले यांनी दिली.
मनपाच्या विळद पंपिंग स्टेशन येथे पाचव्या नवीन विद्युत पंपाची पाहणी करून शुभारंभ मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, जल अभियंता परिमल निकम यावेळी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here