भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी माहूरगडची रेणुका माता – मा. नगरसेवक नरेंद्र कुलकर्णी
अहमदनगर प्रतिनिधी – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणून ओळख असलेली माहुरगडची रेणुका माता या देवीचे स्थान नगर शहरातील शनि चौकामध्ये आहे.सुमारे तीनशे वर्षांची परंपरा असलेले पुरातन काळातील हे मंदिर असून या मंदिरास धार्मिक व आध्यात्मिकतेचा वारसा लाभलेला आहे भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून या ओळख आहे.
शहरातील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान हे मंदिर आहे,मंदिराचे पुजारी मा.नगरसेवक नरेंद्र कुलकर्णी व त्यांच्या पत्नी सौ.गौरी कुलकर्णी हे या मंदिराची देखभाल करतात.
आज सालाबाद प्रमाणे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरामध्ये घट स्थापना करण्यात आली सर्व कोरोना नियमांच्या अटी व शर्तीचे पालन करून भाविक भक्तांना मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती पुजारी कुलकर्णी यांनी दिली.