शहरातील होर्डिंगवर महापालिका करणार कारवाई आयुक्तांचा इशारा
पाच दिवसांमध्ये स्ट्रक्चर ऑडिटचे कागदपत्र सादर करा – आयुक्त डॉ. पंकज जावळे
नगर : अहमदनगर महानगरपालिका हद्दीमध्ये उभारण्यात आलेल्या अनाधिकृत होर्डिंग वर कारवाई होणार आहे परवानगी घेण्यात आलेल्या होर्डिंगचे पाच दिवसांमध्ये स्ट्रक्चर ऑडिट चे कागदपत्र सादर करावे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिला. नुकतेच मुंबई येथे झालेल्या होर्डिंग दुर्घटने नंतर मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी तातडीने आदेश काढत होर्डिंग वर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे शहरात विविध भागांमध्ये अनधिकृत होर्डिंग आहेत तसेच स्ट्रक्चर ऑडिट न झाल्यामुळे एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेने तातडीने होर्डिंग मालकाची बैठक घेऊन सूचना देत कागदपत्राची पूर्तता करावी अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी दिला, मनपा आयुक्तांनी एक समिती नेमली असून त्या समिती द्वारे शहरातील अनधिकृत व अधिकृत होर्डिंगची पाहणी करण्यात येत आहे तसेच याबाबतचा अहवाल सदर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहे.
- Advertisement -