शहरातील ७३ निवृत्त विडी कामगारांना ग्रॅच्युइटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा

- Advertisement -

लाल बावटा विडी कामगार युनियनचा पाठपुरावा

युनियनच्या वतीने निवृत्त विडी कामगारांना ग्रॅच्युइटी रक्कमेचे धनादेश वितरित

अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख

लाल बावटा विडी कामगार युनियनच्या पाठपुराव्याने शहरातील ७३ निवृत्त विडी कामगारांना ग्रॅच्युइटीची अंदाजे तब्बल २२ लाख रुपये रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. तोफखाना येथील विडी कामगार युनियनच्या कार्यालयात निवृत्त झालेल्या विडी कामगारांना प्रातिनिधीक स्वरुपात ग्रॅच्युइटी रक्कमेचे धनादेश वितरित करण्यात आले.

यावेळी लाल बावटाचे जिल्हा सचिव अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, विडी कामगार युनियनच्या उपाध्यक्षा भारती न्यालपेल्ली, इंटकचे सरोजनी दिकोंडा, कविता मच्चा, आयटकच्या संगिता कोंडा, भाग्यलक्ष्मी गड्डम, लक्ष्मी कोटा, ईश्‍वरी सुंकी, हिराबाई भारताल, कमलबाई दोंता आदिंसह विडी कामगार महिला व युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर म्हणाले की, विडी कामगार आर्थिक दुर्बल घटकातील असून, सेवानिवृत्तीनंतर त्यांना उतारवयात औषधे व इतरखर्चासाठी पैश्याची नितांत गरज असते. निवृत्तीनंतर एक ते दोन महिन्यात ग्रॅच्युइटीची रक्कम मिळणे आवश्यक आहे. कोरोनामुळे ती मिळण्यास उशीर झाला असला, तरी ही रक्कम मिळाल्याने सेवानिवृत्त विडी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

कॉ. भारती न्यालपेल्ली यांनी ग्रॅच्युइटीची रक्कम मिळणे हा विडी कामगारांचा हक्क आहे. वृध्दापकाळात ही रक्कम त्यांना आधार ठरणार असून, त्यांचे वृध्दापकाळ सुसह्य होणार असल्याचे, त्या म्हणाल्या.

ठाकुर सावदेकर अ‍ॅण्ड कंपनी मध्ये असलेल्या अहमदनगर शाखेतील ७३ विडी कामगार सेवानिवृत्त झाले होते. कंपनीला उपदान कायदा १९७२ नुसार ग्रॅच्युइटीची रक्कम देय होती. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे ही रक्कम कामगारांना मिळण्यास उशीर झाला. ही रक्कम मिळण्यासाठी लाल बावटा विडी कामगार युनियनच्या वतीने कंपनीकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला.

नुकतेच विडी कंपनीच्या वतीने निवृत्त विडी कामगारांना ग्रॅच्युइटीची रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शहरातील ७३ निवृत्त विडी कामगारांना याचा लाभ मिळणार आहे. कॉ. टोकेकर व न्यालपेल्ली यांच्या हस्ते ग्रॅच्युइटीचे लाभार्थी मिनाक्षी परदेशी, सुनिता श्रीगादी, विजया वल्लाकटी, अंबिका मडूर यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

ठाकुर सावदेकर अ‍ॅण्ड कंपनी विडी कामगारांना ग्रॅच्युइटीची रक्कम दिल्याबद्दल कंपनीचे मालक, पुणे व अहमदनगर शाखेतील व्यवस्थापकांचे लाल बावटा विडी कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. कारभारी उगले, मार्गदर्शक कॉ. सुभाष लांडे, इंटकचे शंकरराव मंगलारम यांनी आभार मानले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles