शहरात रंगला जय तुळजा भवानी महिला बचत गटाचा होम मिनिस्टर कार्यक्रम
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पैठणीसह महिलांनी पटकाविले विविध बक्षिसे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील झारेकर गल्ली येथे महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम रंगला होता. विविध स्पर्धेने होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात महिलांचा उत्साह संचारला होता. जय तुळजा भवानी महिला बचत गटाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रंगलेला हा खेळ पैठणीच्या कार्यक्रमात विविध स्पर्धेचा सामना करीत महिलांनी मनोरंजनात्मक खेळाचा आनंद लुटला. सर्व धर्मिय महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. सोनाली दुर्गुड यांनी प्रथम क्रमांकाचे पैठणी साडी 5 हजार रुपये रोख बक्षीस पटकाविले. तर रोहिणी आगरकर यांनी द्वितीय क्रमांकाचे सेमी पैठणी 3 रुपये रोख व अंजली मुळे यांनी तृतीय क्रमांकाचे चांदीचे जोडवे 2 हजार रुपये रोख बक्षीस मिळवले. विजेत्या महिलांना धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी वृषाली लोंढे, शीतल लोंढे, माधुरी लोंढे, ममता शिंदे, बालिका शिंदे, नितू वाणे, प्रमिला बिंगी, संगीता सब्बन, नागमणी संदुपटला, सुनीता घावटे, छाया नरसाळे, सविता कोटा, शितल दगडे, सोनाली अमृते, पुष्पा घावटे, मालन खरमाळे, मीरा खरमाळे, मंदा शिंदे, आशा आगरकर, पवार, शितल दगडे, अरुणा मामड्याल, अनुराधा बिंगी आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
धनश्री विखे पाटील म्हणाल्या की, प्रत्येक महिलेमध्ये विविध सुप्त कलागुण असतात. पण संसाराच्या जबाबदाऱ्या पेलविताना तिच्यामध्ये असलेले कलागुण कोमजतात. या कार्यक्रमातून तिच्या कलागुण वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. तर जय तुळजा भवानी महिला बचत गटाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
माधुरी लोंढे यांनी महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी जय तुळजा भवानी महिला बचत गट कार्य करत आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करुन त्यांच्या कलागुणांना देखाल प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. बचत गटाच्या मुख्य सचिव नीलिमा येनगुपटला यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळाच्या फेऱ्या घेण्यात आल्या. विविध स्पर्धेचे टप्पे पार करुन महिलांनी बक्षिसांची लयलुट केली. 10 महिलांना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून आकर्षक भेटवस्तू व पाचशे रुपयांचे बक्षीस देण्यात आले. कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती.