अहमदनगर प्रतिनिधी – वाजिद शेख
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त राष्ट्रवादी भवन येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या आढावा बैठकित शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व सर्व सेलच्या पदाधिकार्यांनी केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शहर राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुरु असलेल्या शहरातील कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
शहर राष्ट्रवादीच्या बैठकित आमदार अरुणकाका जगताप व आमदार संग्राम जगताप यांनी जयंत पाटील यांचा सत्कार करुन स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, दादाभाऊ कळमकर, सुमतीलाल कोठारी, अशोक बाबर, नगरसेवक प्रकाश भागानगरे, अंबादास गारुडकर आदिंसह सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहरात राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या सामाजिक, राजकीय उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी सर्व सेलच्या अध्यक्षांनी आपल्या कार्याचा अहवाल सादर केला.
जयंत पाटील यांनी पदाधिकार्यांशी संवाद साधताना पक्ष बळकट करण्यासाठी सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रीय झाले पाहिजे. शहर राष्ट्रवादीचे कार्य उत्तमपणे सुरु आहे. भविष्यातील निवडणुका समोर ठेऊन पदाधिकार्यांनी कार्यकर्त्यांना सक्रीय करण्याचे सांगितले. तर पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाण्याचे आवाहन केले.
तसेच आमदार संग्राम जगताप यांनी कोरोना काळात सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. आमदार संग्राम जगताप यांनी उपस्थित पदाधिकार्यांशी संवाद साधून पक्ष आनखी बळकट करण्याबाबत मार्गदर्शन केले.