शहर विधानसभेची जागा शिवसेनेलाच घेण्याचा संजय राऊत यांच्याकडे आग्रह

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

शहर विधानसभेची जागा शिवसेनेलाच घेण्याचा संजय राऊत यांच्याकडे आग्रह

अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर शहर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेना उभाठा गटाला मिळावी यासाठी शिवसेना पक्ष प्रवक्ते संजय राऊत यांना आग्रह करण्यात आला. प्रदेश युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, शहर उपप्रमुख संदीप दातरंगे, मंदार मुळे,शुभम एरंडे यांचे शिष्ठ मंडळ मुंबईत सामना कार्यालयात गेले होते. संजय राऊत यांनी नगरच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी सकाळी सामना कार्यालयात प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ दिली होती.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला नगर जिल्ह्यात मोठ यश मिळालं त्यामुळे महाविकास आघाडीच्या शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार, आणि काँग्रेस पक्षाच्या अशा पल्लवीत झाले आहेत. नगर जिल्ह्यातील बाराच्या बारा जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात असा विश्वास सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आला आहे.

 

नगर शहर विधानसभा मतदारसंघ दोन टर्मपूर्वी सलग पाच वेळा स्वर्गीय आमदार अनिल राठोड यांच्यामुळे शिवसेना सतत जिंकू शकली. आता हे वैभव परत मिळवण्यासाठी सामान्य शिवसैनिक झटून कामाला लागला आहे.

त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नगरची जागा शिवसेनेने आपल्याकडे घ्यावी आणि ती निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते जीव तोडून प्रयत्न करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नगर शहर विकासापासून कोसो दूर आहे.

त्यामुळे नगरला ज्या पद्धतीने आमदार अनिल राठोड यांनी संरक्षण दिले होते भयमुक्त केले होते विकासाच्या प्रगतीपथावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण त्या वेळला राज्य सरकार मध्ये सत्ता नसल्यामुळे त्याला खीळ बसत होती.

आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी निश्चितपणे सत्तेत येणार आहे आणि नगर शहरातील जनता ही महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून देतील यात शंका नाही. सुजय विखे यांचे मताधिक्य शहरात घटलेले आहे. दोन्ही निवडणुकांमध्ये अनिल राठोड हे फार थोड्या मतांच्या फरकाने पराभूत झाले.

 

आता वातावरण फिरलेले आहे. महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेला मिळाल्यास पूर्वी जसा नगर शहर सेनेचा बालेकिल्ला होता. तो पुन्हा मिळवण्यासाठी ही जागा शिवसेनेने आपल्याकडे घ्यावी असा आग्रह धरण्यात आला.

शिष्टमंडळाचे म्हणणं संजय राऊत यांनी ऐकून घेतल. आपल्या भावना पक्ष नेतृत्वापर्यंत आपण पोहोचू नगरची जागा सेनेला घ्यावी यासाठी आपण सकारात्मक आहोत. लवकरच नगर दौरा करून सामान्य शिवसैनिक पदाधिकारी आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बोलून चर्चा करू आणि मग निर्णय घेऊ जागा वाटपात नगरच्या जागा सेनेलाच मिळवण्यासाठी अपेक्षित प्रयत्न होतील असे आश्वासन राऊत यांनी यावेळी दिले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!