- Advertisement -
मनपा आयुक्तांन कडे विरोधी पक्षनेते यांची निवेदनाद्वारे मागणी
अहमदनगर प्रतिनिधी – शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप घेत असून नियोजन नसल्याने पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होत असून नागरिकांचे पाण्यामुळे हाल सुरू आहेत.पाण्याच्या प्रश्नावर आता प्रधासनाच्या विरोधात सत्ताधारी राष्ट्रवादी कांग्रेससह भजाप रस्त्यावर उतरली असून बुधवारी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे ,विरोधीपक्ष नेते संपत बारस्कर, नगरसेवक सागर बोरुडे, अमोल गाडे,भा कुरेशी यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेऊन पाणी प्रश्नावर तातडीने बैठक घेऊन पाणी प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली आहे.
सध्या उन्हाळयाचे दिवस असल्याने शहर व उपनगरांमध्ये पाणी प्रश्न निर्माण झालेला आहे.नागरीकांना हंडाभर पाण्याकरीता वणवण फिरण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.मोठया प्रमाणात पाणी पुरवठा विस्कळीत झालेला असल्याने शहरसह उपनगरामध्ये कोणत्याही भागामध्ये पाणी पुरवठा पूर्ण दाबाने सुरळीत होत नाही.त्यामुळे नागरीकांमध्ये महानगरपालिका लोकप्रतिनिधीन विषयी रोष निर्माण झाला आहे.
केंद्रशासित ‘अमृत ‘ अभियान अंतर्गत पाणी पुरवठा योजना मार्गी लावणे व शहराचा पाणी प्रश्नासंदर्भात महानगरपालिके मध्ये आ.संग्राम जगताप,महापौर रोहीणीताई शेंडगे,उपमहापौर गणेश भोसले,सभापती कुमारसिंह वाकळे,सभापती महिला बालकल्याण समिती मा.सौ.पुष्पाताई बोरूडे,तसेच पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत लवकरात लवकर बैठक घेऊन पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांनी आयुक्तांकडे केली आहे.
- Advertisement -