शहर शिवसेनेच्या वतीने किरिट सोमय्या यांचा जाहीर निषेध

- Advertisement -

‘विक्रांत’च्या नावाने गोळा केलेले पैसे खिशात घालणार्‍या किरिट सोमय्या यांची हकालपट्टी करावी – संभाजी कदम

अहमदनगर प्रतिनिधी –  आयएनएस विक्रांत च्या नावाखाली सर्वसामान्य जनतेकडून गोळा केलेल्या पैशांचा महाराष्ट्राचा देशद्रोहि किरिट सोमय्या याचा शहर शिवसेनेच्यावतीने एस.टी.स्टॅण्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जाहीर निषेध करुन निदर्शने करण्यात आली.
याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक गणेश कवडे, संतोष गेनप्पा, काका शेळके, शरद कोके, आशा निंबाळकर, अरुणा गोयल, बंटी खैरे, सुरेश तिवारी, गौरव ढोणे, अण्णा घोलप आदि उपस्थित होते.
याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले, आयएनएस विक्रांत या युद्ध नौकेने भारतीय सैन्यसाठी महत्वाची भुमिका बजावली होती. सैनिकांबरोबरच देशाचा अभिमान असलेल्या या विक्रांतचे ऐतिहासिक महत्व पाहता तिचे जतन व्हावे, भावी पिढीला या युद्धनौकेचा इतिहास कळावा, यासाठी जतन व संवर्धन करण्याचा निर्णय घेतला, यासाठी लोकसहभाही घेण्यात आला.
परंतु यासाठी किरिट सोमय्या सारख्या भ्रष्ट लोकांना विक्रांतच्या नावे कोट्यावधी रुपयांचा निधी गोळा करुन तो आपल्या खिशात घातला आहे, अशा देशद्रोही व्यक्तीला भाजपाने पक्षातून हकलपट्टी करावी व गोळा केलेल्या पैसे वसूल करण्यात यावा, अशी मागणी आम्ही करत असल्याचे सांगून किरिट सोमय्या यांच्या निषेध व्यक्त केला.
याप्रसंगी संजय शेंडगे, अभिषेक कळमकर, गणेश कवडे यांनीही किरिट सोमय्यांनी विक्रांतच्या नावावर केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी केली.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!