शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन आयोजित आंतरराष्ट्रीय मानांकन खुली बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीला सुरुवात
बुद्धिबळ खेळ खेळल्याने माणूस जीवनात यशस्वी होतो- भाग्यश्री पाटील
अहमदनगर (प्रतिनिधी)- शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन आयोजित अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव व न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते चौथ्या फेरीची सुरुवात करण्यात आली समवेत बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, ज्येष्ठविधीतज्ञ शिर्के, विश्वस्त पारुनाथ ढोकळे, खजिनदार सुबोध ठोंबरे, श्याम कांबळे, संजय खडके, प्रकाश गुजराथी, दत्ता घाडगे, नवनीत कोठारी, देवेंद्र ढोकळे, सुनील जोशी, अनुराधा बापट, डॉ.स्मिता वाघ, रोहिणी आडकर, पंच प्रवीण ठाकरे आदीसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील म्हणाले की, जिल्हा बुद्धिबळ संघटनेने अतिशय उत्कृष्ट दर्जाची ही बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेला मिळालेला सहभाग बघत या स्पर्धेमुळे मोठे व लहान खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार व या खेळामुळे बुद्धीला चालना मिळणार असून बुद्धिबळ खेळामध्ये आपण उत्कृष्ट सराव केल्याने आपण जीवनात यशस्वी होणार असल्याची भावना व्यक्त करत बुद्धिबळ खेळ हा न्यायालयाशी निगडित असल्याचे सांगितले.