कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील मोठ्या उत्साहात शारदीय नवरात्र उत्सव सुरू झाला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राशीन,तुळजापूर,माहूरगड,काळुबाई यासह विविध ठिकाणावरून ज्योत आणून वाजत गाजत मिरवणुकीने देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
उत्साहाने देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
सध्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे यामुळे या वेळी शारदीय नवरात्रौत्सव याचा परिणाम झाला असला तरी कर्जत जवळील जामदार वाडा, तसेच चिंचोली काळदात येथील युवकांनी सर्व नियमाचे पालन करत ज्योत पायी आणली.यानंतर कर्जत शहरांमधून मिरवणूक काढून देवीची प्राणप्रतिष्ठा केली.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रघु आबा काळदाते,वडगाव येथील सरपंच नीलेश तनपुरे व मोठ्या संख्येने युवक नागरिक सहभागी झाले होते
कर्जत तालुक्यात नवरात्र उत्सवाची सुरुवात मोठ्या उत्साहात
कर्जत येथील माय मोर्तब देवी तसेच अक्काबई मंदिर या सह घरोघरी देवीच्या मूर्तीची घटस्थापना करण्यात आली
तालुक्यातील जागृत देवस्थान असलेल्या राशीन व कुळधरण येथे देवीचे पुजारी मानकर यांच्या उपस्थितीमध्ये घटस्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली.
यावेळी बोलताना रघु आबा काळदाते यांनी सांगितले की कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर आम्ही आई जगदंबे संपूर्ण देशावर आलेले हे संकट दूर करावे असे साकडे घातले आह सर्व नियमांचे पालन करत मांढरदेवी येथील काळुबाई मंदिरांमधून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावरून देवीची ज्योत आणली आहे.यामध्ये समाजात विकासाची मशाल आमदार रोहित पवार यांच्यामार्फत यापुढील काळामध्ये आणखीन प्रकाशमान होणार आहे.चिंचोली काळदात येथील आमदार रोहित पवार मित्रपरिवार यांच्या वतीने देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा गावामध्ये करण्यात आली आहे.
- Advertisement -