शाळा, महाविद्यालयातील रॅगिंग प्रकार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे – न्यायाधीश रजनीकांत जगताप

- Advertisement -
नागेश विद्यालयात कायदेविषयक शिबीर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

जामखेड प्रतिनिधी – नासीर पठाण 

शाळेत कोणी अमानवीय अगर अनैसर्गिक कृत्य एखाद्या विद्यार्थ्यांबाबत करीत असेल त्याला रॅगिंग म्हणतात. असे प्रकार होत असेल तर याबाबत विद्यार्थ्यांनी सजग राहून शाळेचे मुख्याध्यापक अगर अधिकारी यांना अवगत करावे व त्यांनी याबाबत शहानिशा करून पोलीसांत गुन्हा नोंदवावा जर प्रशासन किंवा अधिकारी हलगर्जीपणा करीत असेल तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल होतो. रॅगिंग प्रकार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता विद्यार्थ्यांनी अलर्ट रहावे व विद्यालय, महाविद्यालये यातील रॅगिंग प्रकरणाला वाचा फोडली तर या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे सार्थक झाले असे म्हणता येईल असे प्रतिपादन जामखेड येथील न्यायाधीश रजनीकांत जगताप यांनी केले.

जामखेड तालुका विधी सेवा समिती, वकील संघ व श्री नागेश विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नागेश विद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न झाले या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानावरून न्यायाधीश रजनीकांत जगताप बोलत होते

यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, स्कूल कमिटीचे हरिभाऊ बेलेकर, प्राचार्य मडके बी के ,उपप्राचार्य तांबे ए एन, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका के डी चौधरी अँड. एम एन नागरगोजे, रमेश बोलभट, एनसीसी प्रमुख मयूर भोसले, सुनील भमुद्रे, विनोद नाईकनवरे, अनिल चव्हाण ज्ञानेश्वर चव्हाण, नागेश संकुलातील शिक्षक विद्यार्थी सर्व सेवक उपस्थित होते.

यावेळी न्यायाधीश रजनीकांत जगताप यांनी विद्यार्थ्यांना बालहक्क कायदा, महाविद्यालय जीवनात होणाऱ्या रॅगिंग विषयी कायदे, महिला अत्याचार, बाल छळवणूक, वाईट स्पर्श, लोकन्यायालय, मध्यस्थी, कौटुंबिक हिंसाचार कायदा, वरिष्ठ नागरिकांचे अधिकार, विद्यार्थ्यांचे अधिकार, १८ वर्षे पूर्ण झाले तर वाहन परवाना काढून वाहन चालवणे याविषयी शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून न्यायाधीश जगताप यांना एनसीसीच्या वतीने मानवंदना देण्यात आली. शिष्यवृत्ती मध्ये पात्र नागेश विद्यालयाचे 65 व कन्या विद्यालयाचे 40 विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. स्पेशल फॉर्स आर्मी मध्ये भरती झालेल्या शिवम काळे याचा सत्कार करण्यात आला व 17 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगर कॅम्प प्रमाणपत्र एनसीसी विद्यार्थ्यांना न्यायाधीश रजनीकांत जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

तसेच तहसीलदार योगेश चंद्र यांनी शिक्षण हक्क कायदा संदर्भात माहिती दिली. विद्यालयामध्ये विधी सेवा प्राधिकरण कायदेशीर माहिती, वरिष्ठ नागरिकांचे अधिकार, लोकन्यायालय व सर्व कामकाज, वैकल्पिक वाद निवारण पद्धती, रॅगिंग, बालकांचे हक्क कायदे यांचे पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले.
प्रास्ताविक प्राचार्य मडके बी के, सूत्रसंचालन रमेश बोलभट आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका चौधरी के डी यांनी केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!