खाजगी,अनुदानीत तसेच विना-अनुदानीत शाळेतील विद्यार्थ्यांना फि अभावी परिक्षेपासून दुर करणा-या संस्था चालकांवर करवाई करण्याची मागणी.
जन आधार सामाजिक संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन.
विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केल्यास संघटनेच्या वतीने पालकांसह तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार – प्रकाश पोटे.
अहमदनगर प्रतिनिधी – जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले.

मागील दोन वर्षा पासून संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातल्यामुळे तसेच लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या बंद झाल्या असुन अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत.त्यात हातावर पोट असाणा-या सर्व सामान्य लोकांना तर कुटुबांचे पालण-पोषण करणेही अवघड झाले होते.यात विदयार्थ्यांचे देखील मोठे शैक्षणीक नुकसान झाले.
कोरोना काळात हाताच्या बोटावर मोजन्या एवढयाच शैक्षणीक संस्थानी ऑनलाईन क्लासेस नियमितपणे घेतले असतील.परंतु या सर्व शैक्षणिक संस्थांनी कोरोना काळात तात्पुरती स्वरुपाची फि वसुली थांबवीली होती, आणि आता याच खाजगी/अनुदानीत/विनाअनुदानित, शैक्षणिक संस्था अगदी विदयार्थ्यांच्या वार्षिक परिक्षा तोंडावर आल्या असताना,पालकांना तसेच विदयार्थ्यांना मागील पुर्ण फि भरल्या शिवाय परिक्षेला बसू देणार नाही असे सांगत आहेत.
कुठल्याही शिक्षण संस्थेला केवळ फि मुळे विदयार्थ्यांना परिक्षेपासून (शिक्षणापासून) वंचीत ठेवण्याचा अधिकार नाही आणि एखाद्या विद्यार्थ्यांचा पेपर चुकल्या मुळे त्या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले तर यास कोण जबाबदार असणार.अशी काही घटना घडल्यास संबंधित संस्थेच्या संचालकांवर गुन्हे दाखल करावेत असे प्रकाश पोटे यावेळी म्हणाले.
सर्व खाजगी, अनुदानित, किंवा विना अनुदानित शैक्षणिक संस्था या जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक धोरणानुसार च कार्यरत असतात.परंतू तरीही कुठल्याही खाजगी/अनुदाणीत/विनाअनुदानित,शिक्षण संस्थेने केवळ पैश्यासाठी (फि साठी) विदयार्थ्यांना परिक्षेपासून वंचीत ठेवणाचा प्रयत्न केल्यास आपल्या कार्यालयावर संघटनेच्या वतीने पालकांसह तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी निवेदनाद्वारे सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देताना जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत उपाध्यक्ष दीपक गुगळे, शहराध्यक्ष शहनवाज शेख, संदीप तेलधुणे सर, विजय मिसाळ, अमित गांधी, रोहिणी पवार, इग्निस चव्हाण, वर्षा गांगर्डे, सोहेल शेख, निलेश लाहुंडे,भारत जगदाळे सर आदी उपस्थित होते.