ऑक्टोंबरचे वेतन १ नोव्हेंबर पूर्वी अदा करण्याची शिक्षक परिषदेची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांची दिवाळी गोड होण्याकरिता ऑक्टोंबरचे वेतन १ नोव्हेंबर पूर्वी देण्यासाठी २० ऑक्टोंबरपूर्वी वेतन अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वित्तमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड व वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे यांना शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, कोषाध्यक्ष गणेश नाकती यांनी पाठविले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांना अकरा टक्के महागाई भत्ता व पाच टक्के थकबाकी देण्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाचे शिक्षक परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले. तर राज्यातील शिक्षक शिक्षकेतर यांचे वेतन मागील अनेक महिन्यांपासून उशिरा होत असल्याने संघटनेने अनेकवेळा राज्य सरकारकडे तक्रार केली आहे.
दिवाळी हा सर्वात मोठा सण असून,शिक्षकांचे वेळेत वेतन मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.२ नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होत असून,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना हा सण आनंदाने साजरा करता यावा व त्यांची दिवाळी गोड होण्यासाठी २० ऑक्टोंबरपूर्वी वेतन अनुदान उपलब्ध करून द्यावे.
ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासाठी तसेच महागाई भत्त्याच्या वाढीच्या थकबाकीसाठी जिल्हानिहाय पुरेसे वेतन अनुदान उपलब्ध नसून, तातडीचे प्रयत्न करुन वेतन व वेतनेतर अनुदान उपलब्ध करून देण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
शिक्षक व शिक्षकेतर यांचे ऑक्टोबरचे वेतन १ नोव्हेंबर पुर्वी होण्यासाठी आदेश निर्गमित करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.
दिवाळीपुर्वी शिक्षक व शिक्षकेतरांचे वेतन करुन त्यांची दिवाळी गोड होण्याकरिता शिक्षक परिषदेचे राज्यातील पदाधिकार्यांसह जिल्ह्यातून शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, प्रा.सुनिल पंडित, अशोक झिने, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, सखाराम गारूडकर, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, सौ. अनिता सरोदे, शुभांगी थोरात, विनिता जोशी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, इकबाल काकर, निलेश बांगर, नितीन म्हस्के, महादेव देवकर, अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, संदीप झाडे, राहुल ज्योतिक, प्रविण उकीर्डे, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, जालिंदर शिंदे, सत्यवान थोरे, प्रदीप बोरूडे, युनूस शेख आदी प्रयत्नशील आहेत.