संगमनेर प्रतिनिधी – ह्युंदाई मोटर्स प्रा.ली.तर्फे संपूर्ण भारतात दि ११ ते २० डिसेंबर या कालावधीसाठी ह्युंदाई स्मार्ट केयर क्लिनिक कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे देखीलअधिकृत विक्रेते शिरोडे ह्युंदाई मध्ये या कॅम्पचे आयोजन केले आहे. त्या अनुषंगाने या कॅम्प मध्ये ह्युंदाई च्या ग्राहकांना कार च्या पेड सर्व्हिस व किरकोळ कामासाठी पार्टस व लेबर चार्जेस वर आकर्षक डिस्काउंट ऑफर मिळणार असून ह्युंदाई केयर ऍप, ह्युंदाई मोबिलिटी मेम्बरशिप ऍप इंस्टॉलेशन तसेच रोड साईड असिस्टंट वर्क ऑफर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
यामध्ये ड्राय वॉश , कार सॅनिटायझेशन इ. सुविधा उपलब्ध आहे, या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन शिरोडे ह्युंदाई च्या सर्व्हिस मॅनेजर सौ. तृप्ती कोंडा यांनी केले.