अहमदनगर प्रतिनिधी – डी वाय एस पी संदीप मिटके यांना गोपनीय बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की शिर्डी येथील हेलिपॅड रोडवरील चांगदेव कोते यांच्या खोलीमध्ये अवैध विक्री करता आणलेला गांजाचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आलेला आहे.
प्राप्त माहितीच्या आधारे हेलिपॅड रोडवरील चांगदेव कोते यांच्या खोलीमध्ये पोलिसांनी पोलीस पथकाने पंचायत समक्ष छापा टाकला असता त्या ठिकाणी 2,91,200 रुपये किमतीचा 20 किलो 800 ग्राम गांजा मिळून आला.त्यासोबतच घटनास्थळावर वजन काटा, प्लास्टिकच्या पिशव्या, खाकी रंगाची चिकट टेप, कटर हे साहित्य देखील मिळून आले. घटनास्थळावरून चांगदेव कोते यास ताब्यात घेण्यात आले असून दत्तात्रय बाबुराव करपे,अनिता दत्तात्रय करपे,शुभम दत्तात्रय करपे हे तीन आरोपी फरार आहेत.या आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायदा कलम 20 ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर,श्रीमती स्वाती भोर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप मिटके डीवायएसपी, पीआय नंदकुमार दुधाळ, एपीआय प्रवीण दातरे, पोलीस कॉन्स्टेबल बिरदवडे , गोंधे, भारमल , गोलवड यांच्या पथकाने केली.