शिवजन्मौत्सवानिमित्त बोल्हेगाव संभाजीनगर येथे मा.सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या वतीने  महिलांसाठी संस्कुतिक संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

शिवजन्मौत्सवानिमित्त बोल्हेगाव संभाजीनगर येथे मा.सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या वतीने  महिलांसाठी संस्कुतिक संपन्न.

छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना समाजात मानाचे स्थान व प्रगती व्हावी यासाठी विशेष असे कार्य केले – आ.संग्राम जगताप

नगर :  छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समाजाला प्रेरणा देणारा असून त्याची माहिती युवा पिढीला व्हावी यासाठी पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे आहे. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्याचे काम केले आहे. तरी त्यांचा आदर्श अंगीकारून आपल्या महिलांनी कुटुंबातील मुला-मुलींना संस्काराचे धडे द्यावेत छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना समाजात मानाचे स्थान मिळावे त्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी विशेष कार्य केले होते. स्थायी समितीचे मा.सभापती कुमारसिंह वाकळे यांनी विकास कामांबरोबरच सामाजिक प्रश्न हाती घेऊन सोडविण्याचे काम केले असल्यामुळेच त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन करीत ऋणानुबंध निर्माण केले आहे. असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

शिवजन्मौत्सवानिमित्त बोल्हेगाव संभाजीनगर येथे मा.सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या वतीने महिलांसाठी संस्कुतिक संपन्न झाले यावेळी आ.संग्राम जगताप,धनश्री विखे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर,मा.सभापती कुमारसिंह वाकळे,मा.नगरसेवक राजेश कातोरे,साधना बोरुडे,शैला गिऱ्हे, रजनी अमोद्कर, शामल तिवारी, ज्ञानेश्वरी चाफे,मोनल भुसारे,पुनम राठोड,शिवानी वाजे, राजश्री राजहंस,शामल तिवारी,सहारा सय्यद,मिरा काकडे,अर्चना पवार,ज्ञानेश्वरी चाफे,रूथ मिसाळ,पुजा शर्मा,श्रध्दा गुंजाळ,रत्ना बोरा,सीमा गुंड,गायत्री सातपुते,पल्लवी पानगव्हाणे,वैशालि मुके,निता गोसावी,सुमन गिरी,साधना देशमुख,सुनिता मंचरकर,कल्पना गुंजाळ,मनिषा वांढेकर,शामल भवर,मीरा काकडे,रेखा काकडे ,शितल कराळे,स्वाति फुगारे,शुभांगी लांडगे,नम्रता तनपुरे,पल्लवी शेळके,श्रध्दा ऊंडे,राणी जगताप,प्रणालि मुसळे,पुजा कराळे,वैष्णवी बडधे,स्वाती चौधरी,रोहीणी कराळे,संगिता गवंडे,रजनी अमोदकर,सुनंदा सरोदे,आशाबाई वल्हे,मनिषा कु-हाडे,रूपालि नलगे,कल्पना आडसुळ,अनिता सोनवणे,मनिषा पवार,उज्वला वाघ,शैला गिऱ्हे ,साधनाताई बोरूडे,पुनम मरकड,सुरक्षा राजगुरू,पल्लवी निंबाळकर,प्रिया गंगावणे,मिरा सोनटक्के,आश्विनी टकले,प्राजक्ता खामट,पुनम राठोड,प्रियंका राठोड,योगिता भागवत,रमीला लचके,सुनिता सुर्यवंशी, रूतुजा लचके,काजल आरूणे,सीमा ब्राम्हणे,ललिता भोसले,पुष्पा नाईक,अंबिका घोलप,ज्योती इंगळे,सुष्मा अंगेलु,कावेरी अंगेलु,शितल अवघड,ज्योती बेरड,सुरेखा ठोकळ,समता मरकड,गौरी कुंभकर्ण,रूपालि पठारे,स्मिता मरकड,प्रिती पाथर,साधना गायकवाड,दिपालि निकाळजे,सुवर्णा कराळे,नलिनी वाकळे,ऐश्चर्या गोफणे,श्वेता शेळके,राणी घोरपडे,प्रिती भोसले,प्रज्ञा चाफेकर,अनिता जगदाळे,कांचन शेरे,प्राजक्ता गायकवाड,शितल अनाप आदि उपस्थित होते.

स्थायी समितीचे मा.सभापती कुमारसिंह वाकळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार समाजामध्ये रुजविण्याचे काम आपल्या सर्वांना करावे लागणार आहे. यासाठी वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे आहे. महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मोनल भुसारे, द्वितीय क्रमांक पुनम राठोड व तृतीय क्रमांक शिवानी वाजे यांनी पटकवला आहे. या स्पर्धेमध्ये  बोल्हेगाव-नागापूर परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली संस्कृती परंपरा जोपासण्याचे काम होत असते आपल्याला मिळालेला वारसा अखंडितपणे सुरू राहवा यासाठी आपण सर्वजण मिळून काम करत आहोत कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगल्या विचाराचे लोक एकत्र येत असतात असे ते म्हणाले.

चौकट :  सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना एकत्रित येण्यासाठी व्यासपीठ निर्माण होत असते. तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळत असतो. मा.सभापती कुमारसिंह वाकळे यांचे प्रभागातील नागरिकांसाठी सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचा वारसा जोपासण्याचे काम आपल्या सर्व महिलांना करावे लागणार आहे. महिलांनी हाती घेतलेले काम यशस्वीपणे होत असते. कुमारसिंह वाकळे यांनी विकास कामांबरोबरच आपला प्रभाग स्वच्छ प्रभाग संकल्पना राबवली असून महिला यशस्वीपणे पार पाडतील सामाजिक उपक्रमामध्ये महिलांनी भाग घेऊन लोक चळवळ उभी करावी मा.सभापती कुमारसिंह वाकळे यांचे स्वच्छ सुंदर हरित प्रभागाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे मत धनश्री सुजय विखे यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!