शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांच्याकडून खा.शरद पवार यांचे स्वागत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांच्याकडून खा.शरद पवार यांचे स्वागत

नगर – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार नगरमध्ये आले असता, त्यांचे शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने स्वागत शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.

यावेळी संभाजी कदम यांनी नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे निलेश लंके यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीच्या सर्वांनी एकदिलाने काम केल्याने निलेश लंके यांचा विजय झाला. धनशक्ती विरोधात जनशक्ती एकत्र आल्याने हा विजय झाला. नगर शहरात शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत सक्रिय सहभाग देत जास्तीत जास्त मते मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आगामी विधानसभेतही अशीच एकजूट ठेवून महाविकास आघाडीच्या उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करु, असा विश्‍वास व्यक्त केला.

यावेळी खा.शरद पवार यांनीही महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकार्‍यांनी एकदिलाने काम करावे. सर्वच पक्षाचे प्रमुख आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून, ताकद देण्याचे काम करतील. येणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठीच्या तयारीला लागावे, असे सांगितले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!