शिवसेना शिंदे गटाच्या अल्पसंख्याक विभागाच्या उत्तर महाराष्ट्र समन्वयक पदी अंजर अन्वर खान यांची निवड.
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेना शिंदे गटाच्या ऑल इंडिया उलमा बोर्डचे राष्ट्रीय महासचिव अंजर अन्वर खान यांच्यासह अनेक अल्पसंख्यांक समाजातील युवकांनी मोठ्या प्रमाणात गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला होता.आज अंजर अन्वर खान यांची अल्पसंख्यांक विभागाचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक पदी नियुक्ती करून त्यांना नियुक्तीचे पत्र देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समवेत डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, उपनेता इरफान सय्यद आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे म्हणाले की, शिवसेना ही हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर anand dighe यांच्या विचाराने काम करत आहे. जनतेची कामे व्हावी व त्यांचे जीवनमान उंच व्हावे यासाठी विविध योजना सुरू केल्या आहे. त्याचाच अनेकांना लाभ होत असून सर्वांना न्याय देण्याच्या भूमिकेतून शिवसेनेचे काम होत असल्याने अनेक लोक शिवसेनेची जोडले जात असून अहमदनगर शहरांमध्ये ही शिवसेनेची ताकद वाढत असून कार्यकर्त्यांना पदाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळत असल्याने अंजर अन्वर खान यांचे अल्पसंख्यांक समाजामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान व सामाजिक कार्य असल्याने व त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांच्यावर शिवसेना उत्तर महाराष्ट्र समन्वयक पदी जबाबदारी देण्यात आली असल्याचे सांगितले. तर नियुक्तीनंतर अंजर अन्वर खान म्हणाले की, शिवसेना हा पक्ष जातीवादी पक्ष नसून नागरिकांच्या प्रश्नासाठी तत्पर धावत येणारा पक्ष असून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असून या पदाच्या माध्यमातून मशीद, दर्गा, मदरसा व धर्मगुरूंचे प्रश्न सोडवून तळागाळातील अल्पसंख्यांक समाजातील विविध प्रश्नांबरोबरच बेरोजगारीचे प्रश्न देखील या पदाच्या माध्यमातून लवकरात लवकर नोकरी मिळावा घेण्यात येणार असल्याची भावना व्यक्त केली.