शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन

- Advertisement -

शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन

नगर शहरातील विज पुरवठा तातडीने सुरळीत करावा

अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल – भगवान फुलसौंदर

नगर – अहमदनगर शहरातील वारंवार होणारा खंडीत वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा शिवसेना (ठाकरे गट) च्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आला. याप्रसंगी याप्रसंगी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, नगरसेवक दत्ता कावरे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, संतोष गेनप्पा, अशोक दहिफळे, संदिप दातरंगे, जेम्स आल्हाट, गौरव ढोणे, जालिंदर वाघ, गिरिधर हांडे, संजय आव्हाड, अरुण झेंडे, दिनेश लाड, मुन्ना भिंगारदिवे आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या एक-दोन महिन्यांपासून नगर शहरात अचानक वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वीजे अभावी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. वीजेची झालेली दरवाढ आणि वेळेवरही लाईट बील भरुनही नागरिकांना व व्यापार्‍यांना योग्य पद्धतीने सेवा मिळत नाही. परिणामी इर्न्व्हटर, जनरेटरचा आधार घ्यावा लागत आहे, त्यामुळे नाहक खर्च वाढत आहे. वीज प्रवाह अचानक कमी-जास्त होत असल्याने इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बिघडत  आहेत.

थोडे वादळ व पावसाचे वातावरण तयार झाले की लाईट चार-चार तास तर कधी-कधी रात्रभर येत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना रात्रभर जागरण करावे लागते आहे. वीज वितरण कार्यालयात फोन लावला तरी  फोन उचलत नाही आणि उचललाच तर व्यवस्थीत उत्तरे देत नाही. तरी ही वीज वितरण व्यवस्था तातडीने सुरळीत न झाल्यास शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.

याप्रसंगी भगवान फुलसौंदर म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून विज वितरण कंपनीकडून भारनियमन जाहीर झालेले नाही तरीही दिवसभरातून अनेकवेळा लाईट घालविली जाते. त्यामुळे नागरिक, व्यापारी यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लाईट नसल्याने पाण्याच्या टाक्या भरणे अवघड होते. अचानक कमी-जास्त विज पुरवठा होत असल्याने घरगुती उपकरणे बिघडण्याची प्रमाणही वाढले आहे. सध्याचे वादळ-वारा, पाऊसाचे दिवस असल्याने याचे नियोजन करणे गरजे आहे, परंतु विज वितरण कंपनीचे लक्ष नसल्याने नागरिकांना नहाक त्रास होत आहे. यात तातडीने सुधारणा न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे फुलसौंदर म्हणाले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles