नेवासा फाटा प्रतिनिधी – कमलेश गायकवाड
काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा प्रभारी पदी शिवाजीराजे जगताप यांची सर्वानुमते नुकतीच निवड करण्यात आली आहे.
आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचा मोठा मेळावा शिर्डी येथे घेण्यात येणार आहे.माजी मंत्री प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे साहेब,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विजयजी अंभोरे साहेब प्रदेश सरचिटणीस उत्कर्षाताई रूपवते,अनुसूचित जाती विभागाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ दादा हत्ती आंबेरे,प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक राहुल भाऊ दिवे साहेब,डॉ.जितेंद्रजी देहाडे, पदाधिकाऱ्यांचा यावेळी नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार.डॉ.सुधीर तांबे,आमदार लहू कानडे उपस्थित राहणार आहेत.त्या संदर्भातील आढावा बैठक नुकतीच शिर्डी येथे पार पडली.ही बैठक काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश समन्वयक शिवाजीराजे जगताप,प्रदेश समन्वयक बंटीभाऊ यादव,प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, जिल्हा समन्वयक अरुणराव गावित्रे,जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
यावेळी पदाधिकार्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला.प्रदेश समन्वयक शिवाजीराजे जगताप यांची सर्वानुमते ठराव करून अहमदनगरच्या जिल्हा प्रभारी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
यावेळी त्यांच्या निवडीची सूचना प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे यांनी मांडली व अनुमोदन अरुण काका गावित्रे यांनी दिले यावेळी सर्व उपस्थितांनी हात वर करून ठराव संमत केला.
यावेळी बोलताना प्रदेश समन्वयक शिवाजीराजे जगताप म्हणाले की,येणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त काँग्रेस पक्षाचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा.पक्षामध्ये जो तळमळीने काम करेल त्यांना खांद्यावर घ्यायची जबाबदारी आमची असून कार्यकर्त्याला उघडे पडू देणार नसून नेहमी त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे समन्वयक बंटीभाऊ यादव यावेळी बोलताना म्हणाले की,काँग्रेस पक्ष तळागाळातील व्यक्तीचा विचार करतो.समाजातील प्रत्येक घटकाला काँग्रेस पक्ष हा न्याय देत असतो या पक्षामध्ये कुठल्या प्रकारचे मतभेद केले जात नसून सर्वांना बरोबर घेऊन चालणारा हा काँग्रेस पक्ष आहे.
काँग्रेसमध्ये जास्तीत जास्त लोकांना सहभागी करा गाव कमिट्या स्थापन करून प्रत्येक खेडोपाडी जा व काँग्रेसचे महत्त्व लोकांना पटवून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तसेच जिल्हा कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड यांनी यावेळी बोलताना सांगितले की,उद्याच्या होणाऱ्या मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येणार्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद नगरपालिका निवडणुकांमध्ये प्रत्येकाने आपले हेवेदावे बाजूला ठेवून काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळापर्यंत घेऊन जायला पाहिजे.जास्तीत जास्त नगरसेवक,जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य काँग्रेसचे कसे निवडून येतील याबाबत प्रयत्न करण्याचे आवाहन गायकवाड यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस उमेश भाऊ शेजवळ,जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सविताताई विधाटे,काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुदामराव कदम साहेब,कोपरगाव शहर अध्यक्ष रवींद्र साबळे,कोपरगाव तालुका अध्यक्ष चंद्रकांत बागुल,राहता तालुका अध्यक्ष बाळासाहेब पगारे,शिर्डी विधानसभा अध्यक्ष सुरज म्हंकाळे,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यादवआण्णा त्रिभुवन,कोपरगाव महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्षा मंगल ताई आव्हाड,संजय आव्हाड,भाई शेख,छबुराव शिंगाडे,भास्कर कांबळे,शेखर साळवे,आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अरुण काका गावित्रे हे होते तर सूत्रसंचालन शहराध्यक्ष रवींद्र साबळे यांनी केले तर आभार यादव त्रिभुवन यांनी मानले.