शिव राष्ट्र सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संतोष नवसुपे यांचा आरोप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

शिव राष्ट्र सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संतोष नवसुपे यांचा आरोप

लोढा व आगरकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला असल्याचा गंभीर आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- शिव राष्ट्र सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संस्थापक अध्यक्ष संतोष नवसुपे म्हणाले की, दक्षिण लोकसभेचा धक्कादायक निकाल लागलेला आहे. यामध्ये उमेदवारांच्या पराजयामध्ये काही असंतुष्ट नेतृत्वहीन कार्य शून्य लोकांचा हात आहे. यामध्ये लोढासारख्या ४२० गुन्ह्यात सहभाग असणारे लोक या पराजय झालेल्या उमेदवाराच्या पाठीशी होते म्हणून जनतेने या उमेदवाराला नाकारले ४२० गुन्ह्यातील मंडळी ज्या पण उमेदवाराच्या पाठीशी असतात त्यांचा पराजय होतो तसेच या लोकांचं असे म्हणणे आहे. १९९२ ते १९९८ मध्ये यांच्या सौभाग्यवती नगराध्यक्ष या पदावर असताना शहराचा विकास केला या ठिकाणी त्यांची कारकीर्द सांगायची तर सक्कर चौक ते लाल टाकी रस्ता फक्त आणि फक्त कागदोपत्री झालेला रस्ता आहे. याचे लाखो रुपये मलिदा यांनी खाल्ला यामुळे १९९८ नंतर वसंत लोढा व आगरकर हे आज पावतो कुठलेही पद न झाल्याने या नैराश्याच्यातून ही मंडळी असे बिनबुडाचे आरोप करत आहे.

लोढा व आगरकर ही मंडळी आजपर्यंत विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवारांच्या घरी जाऊन उमेदवारी मागतात मागील निवडणुकीत यामुळे आगरकरांचा पराभव सुद्धा झालेला आहे. तसेच आगरकर आज ज्या विशाल गणपती मंदिराचे अध्यक्ष आहे त्या मंदिराचे काम आम्ही लहानपणापासून ते आता ४०-५० वर्षाचे झालो तरी ते काम अद्याप पर्यंत चालू आहे. त्यांना ज्या पद्धतीने या मतदारसंघात नवीन उमेदवार म्हणून पंकजाताई मुंडे लागतात तसेच त्यांनी विशाल गणपती अध्यक्षपदाचा पदभार दुसऱ्यांना द्यावे कारण बरीच वर्षे झाले त्यांच्या वडिलोपार्जित पद त्यांच्याकडे आहे. तसेच त्यांना नगरची गुंडगिरी वाढलेली दिसते खरी गुंडगिरी त्यांनी आगरकर मळ्यापासूनच सुरू केलेली.

दोन गुंठे जागेच्या व्यवहार होऊन सुद्धा वर्मा या व्यक्तीस पुन्हा दोन गुंठे जागा परत मागे घेतली आणि न दिल्यास जीवे मारू अशी धमकी दिली शेवटी वर्मा ने न्यायालयात धाव घेतली मग आगरकर यांच्यावर फौजदारी दाखल करा असा आदेश न्यायालयाने दिला मंग नगर शहरातील खरी गुंडगिरी कुठून सुरू झाली हे सांगायला नवीन नाही. या दोघांनी विनाकारण आरोप करणे सोडावे व शहराचे वातावरण बिघडू नये याची काळजी घ्यावी अहमदनगर शहराला गेली 25 वर्षापासून विकासाला वंचित ठेवणाऱ्या स्वर्गीय अनिल भैय्यांना पण यांनी बोटे मोडून विरोध केला स्वर्गीय दिलीप गांधी यांना पण याच नगर अर्बन बँकेत खासदारकीला व मंत्रीपदाला यांचाच विरोध होता हे दोघे कधीच खासदार गांधी यांचा उबरा चढले नाही वारंवार जनता तुम्हाला नाकारते आहे.

हे लक्षात घेऊन या निवडणूक आली की तुम्ही शहराची शांतता भंग करतात आपण जेष्ठ आहात याच भान ठेवा हेच हिंदूंचे मोर्चा काढतात व हेच भाजपचा उमेदवार पाडून विविध रंगाचे गुलाल उधळण्यास कारण ठरतात शहराची शांतता काही जगदीश भोसले यांची हत्या झाल्यापासून भंग झालेली आहे. त्यावेळी तुम्ही अंत्यविधीत म्हटलं खून का बदला खून से लेंगे मंग का २५ वर्षे आमदारकी भोगली सत्ता भोगी पणा तुमच्या रक्तात आहे म्हणून तुम्हाला झोप येत नाही सिताराम सरडा येथील कॅन्टींग चे तेथील इतर गुंड लोकांचे अतिक्रमण काढा मग तुमची पाठ थोपटून तिथं झुकते माफ का देता अशा विविध प्रश्नावर शिव राष्ट्र सेनेकडे उत्तरे आहे पण आपल्या ज्येष्ठ आहात शहरात आपल्या मुळेच विविध रंगाचे गुलाल उधळले जात असल्याचा आरोप शिव राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला यावेळी शहर महिला अध्यक्ष अर्चना परकाळे, तालुका अध्यक्ष विशाल जाधव, युवक अध्यक्ष शंभू नवसुपे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!