शुटिंग घेतल्याचा राग येऊन शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी
अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्यावरचे चेंबर फोडल्याची शुटिंग घेतल्याचा राग येऊन शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अक्षय कांबळे व त्यांची आई (रा. नागापूर गावठाण) यांच्यावर सोमवारी (दि.10 जून) रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी अंतोन गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
नागापूर गावठाण येथे राहत असलेल्या घरासमोर असलेल्या रस्त्यावरील अक्षय कांबळे यांनी रस्त्यावरचे चेंबर फोडले व घरासमोरून पाणी येत असल्याचे मोबाईलने शुटिंग घेत असताना आरोपी व त्याच्या आईने शूटिंग का काढतो? असल्याची विचारणा करुन शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत गायकवाड यांनी म्हंटले आहे.