शुभम वाघमारे यांची पुरवठा निरीक्षकपदी निवड

- Advertisement -

शुभम वाघमारे यांची पुरवठा निरीक्षकपदी निवड

विविध मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव

पारनेर : प्रतिनिधी

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत शुभम संजय वाघमारे यांची पुरवठा निरीक्षकपदी निवड झाली आहे.शुभम हा पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे यांचा मुलगा तर पारनेर दर्शनचे कार्यकारी संपादक विजय वाघमारे यांचा पुतण्या आहे.

संरक्षण शास्त्र (डिफेन्स सायन्स), तत्वज्ञान (फिलोसॉफी) या विषयात शुभम पहिल्याच प्रयत्नात नेट आणि सेट परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे . उत्तर कोरियातील विद्यापीठाने शुभमला फेलोशिप प्रदान केली होती.

शुभमच्या यशाबद्दल खासदार नीलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, नगराध्यक्ष नितीन अडसुळ, उप नगराध्यक्ष जायदा शेख,पारनेर पब्लिक स्कूलचे संस्थापक,प्राचार्य गीताराम म्हस्के, किसान युनीयन परिवाराचे अध्यक्ष,माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य दिनेश औटी, शिक्षक नेते रा.या.औटी, माजी उपनराध्यक्षा सुरेखा भालेकर, वसंत चेडे, अशोक चेडे, नंदकुमार दरेकर,दिलीप भालेकर, विठ्ठल औटी,संजय देशमुख, बापूसाहेब हांडे यांनी अभिनंदन केले आहे.

फोटो ओळ

पुरवठा निरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शुभमच्या सहकाऱ्यांनी जल्लोष केला.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles