शेत शिवारातील पाणी,वीज,रस्ते व अतिक्रमणांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पावीर तंटामुक्ती शिवार सभेचे आयोजन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचा पुढाकार

अहमदनगर (प्रतिनिधी) – शेत शिवारातील पाणी,वीज व रस्त्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने पावीर तंटामुक्ती शिवार सभा घेण्यात येणार आहे.गाव शिवारामध्ये शिवार सभा भरवून शेतकर्‍यांच्या रस्त्यांच्या अडचणी,शिवारातील नाल्यावर असणारे अतिक्रमणे दूर करण्यासाठी पुढाकार घेतला जाणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड.कारभारी गवळी व अशोक सब्बन यांनी दिली.

जिल्ह्यातील बहुतांश सर्व तालुके अवर्षण प्रवणग्रस्त आहेत.त्यामुळे सिंचन पाण्याची सातत्याने टंचाई भासते.जलसंधारणामध्ये ओढे,नाले खोल करून रुंद केल्यास आणि त्याचबरोबर प्रत्येकी २०० मीटरला सिमेंटचे बंधारे घालण्याच्या तंत्रामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकर्‍यांना मोठी सोय होणार आहे.परंतु अनेक शेतकर्‍यांनी सरकारी ओढे नाल्यांवर अतिक्रमणे करून ओढे,नाले बुजवून टाकले त्यामुळे जलसंधारणाच्या कार्यामध्ये अडथळे येत आहे.

जिल्हा पावीर तंटामुक्त करण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला असून,पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी शिवारात रस्त्याबाबतचा पहिली तंटामुक्ती शिवार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.रस्ते नसल्याने अहमदनगर जिल्ह्यात शेकडो एकर जमीन पड आहे.त्याचबरोबर ओढ्या,नाल्यांवर अतिक्रमणामुळे जलसंधारणाची कामे ठप्प झाली आहे.परंतु ओढे नाल्यांवरील अतिक्रमणे दूर करून ओढ्याची रुंदी,खोली,बंधार्‍याची सोय झाल्यास नव्याने हजारो एकर जमीन हंगामी बागायती होऊन शकणार असल्याचे अशोक सब्बन यांनी म्हंटले आहे.

पावीर म्हणजे शिवारातील पाणी,वीज आणि रस्ते यांची सोय होय.या संदर्भातील तक्रारी समन्वयाने सोडविण्यासाठी पावीर तंटामुक्ती शिवार सभांची आखणी करण्यात आली आहे.पंचक्रोशीतील मान्यता असणार्‍या पुढारी,सामाजिक कार्यकर्ते यांना सभांमध्ये बोलावून सामंजस्याने रस्ते किंवा ओढ्याचे अतिक्रमणाबाबत तंटे सहज सुटू शकणार असल्याचे अ‍ॅड.गवळी यांनी म्हंटले आहे.

जिल्ह्यात पावीर तंटामुक्ती शिवार सभेच्या आयोजनासाठी अ‍ॅड.गवळी,अशोक सब्बन,कॉ.बाबा आरगडे, जालिंदर बोरुडे,पै.नाना डोंगरे,विजय भालसिंग, वीरबहादूर प्रजापती,सुधीर भद्रे,शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब गायकवाड,विठ्ठल सुरम,अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!