शेलार कुटुंबीयांचे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण
मारहाण करून मोकाट फिरत असलेले आरोपीला अटक करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- ता. पारनेर जिल्हा अहमदनगर पाडळी रांजणगाव येथील संजय बबन शेलार यांना १३ मे २०२४ रोजी आरोपी किशोर करंजुले याने मारुती बाबा जाधव यास मारहाण केल्याने मारुती जाधव याला सुपा पोलीस ठाण्यात जाण्यासाठी भाड्याने गाडी साठी शेलार यांच्याकडे गेला व गाडीत बसून जात असताना आरोपी किशोर करंजुले हा गाडी समोर आडवा झाला व मोबाईल हिस्काउंन घेऊन जाधव यास गाडीतून खाली उतरवले व मी माझी गाडी घेऊन घरी आलो व आरोपी किशोर करंजुले याने मनात राग ठेवून लोखंडी पाईप घेऊन गावात आला व लोखंडी पाईप ने मला दोन्ही पायावर छातीवर व हातावर जबर मारहाण करून रक्त भांबाळ केले मी बेशुद्ध अवस्थेत होतो आरोपी करंजुळे हा पळून गेला व त्यानंतर घरचे आले व त्यांनी मला गाडीत बसवले व पोलीस स्टेशनला घेऊन गेले व त्या अगोदर आरोपी हा पोलीस स्टेशनला हजर होता व मारहाण करून देखील उलटा आमच्यावरच खोटे गुन्हे दाखल करत होते.
त्यानंतर मी व माझ्या कुटुंबासमवेत तक्रार देत असताना घडलेली हकीकत सांगत असताना ठाणे अंमलदार व पोलीस हे आमच्यावर दबाव आणत होते तुम्ही सांगितल्याप्रमाणे तक्रार देता येणार नाही आम्ही जसे सांगतो तशी तक्रार द्या असे पोलिसांचे म्हणणे होते त्यामुळे आरोपी किशोर करंजुले यांनी अनेक वेळा मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केलेली आहे. त्यामुळे आरोपी किशोर करंजुले याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून हा आरोपी पोलिसांशी व राजकीय नेत्यांशी वरदहस्त असल्याने आरोपी हा गावात दहशत पसरवत आहेत त्यामुळे या आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय समोर उपोषण करताना संजय शेलार, संध्या शेलार, सारथी शेलार, सुनील सकट आदी उपस्थित होते.
- Advertisement -