शेवगावला झालेल्या दरोड्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता

0
78

अहमदनगर(प्रतिनिधी)- शेवगाव येथील विद्यानगर मध्ये २०१७ साली झालेल्या दरोड्यात चार व्यक्तीच्या खून प्रकरणातील आरोपींची सबळ पुरावा अभावी निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने दिला असल्याची माहिती अ‍ॅड.हनीफ शेख यांनी दिली.

१८ जून २०१७ रोजी शेवगांव तालुक्यातील विद्यानगर येथील आप्पासाहेब हरवणे यांच्या घरावर दरोडा पडला होता.कुटुंबासह पत्नी, मुलगा, मुलगी सर्व झोपेत असताना अज्ञात व्यक्तींनी घरात बसून घरातील दागदागिने एकूण ४५ हजार दोनशे रुपये चोरून नेले. दरोडेखोरांना कुटुंबीयांनी विरोध केला असता, घरातील सर्व लोकांना (चौघांना) धारदार शस्त्राने गळा चिरून ठार मारण्यात आले.

सदर घटनेबाबत शेवगाव पोलीस स्टेशन यांनी आप्पासाहेब यांचा मेहुना संतोष झिरपे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदवला.सदर प्रकरणी तपास करून नेवासा येथील सराईत गुन्हेगार उमेश हरिसिंग भोसले (रा. बाभुळखेडा), अल्ताफ छगन भोसले (रा. मुकींदपूर), अमोल संतोष पिंपळे (रा. गिडगाव), परसिंग हरिसिंग भोसले (रा. बाभुळखेडा), रमेश छगन भोसले (रा. नागफनी) यांना अटक करून तपासात पुरावे गोळा करुन आरोपीविरुद्ध कलम 395, 396 अन्वये आर्म अ‍ॅक्ट कलम 3, 25, 7 नुसार न्यायालयात दोषारोप पत्र पाठविले.

सदरची केस अहमदनगर येथील सत्र न्यायाधीश एम. आर.नातू यांच्या पुढे चालली.त्यामध्ये सरकारी पक्षाच्यावतीने एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात आरोपी विरुद्ध सबळ पुरावा नसल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय २ डिसेंबर रोजी झाला.आरोपींच्या वतीने अ‍ॅड.हनीफ शेख,अ‍ॅड. यास्मीन शेख यांनी काम पाहिले.अ‍ॅड.संदीप एस.कुटे यांनी त्यांना सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here