युवा भविष्यकाळाचा वेध घेणारा – उमेश भालसिंग
शेवगाव प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील फलकेवाडी येथे गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेची सांगता दि १६ सप्टें रोजी विनायक इलेव्हन शेवगाव ग्रुपने अंतिम सामना जिंकत रोख रक्कम २१ हजार रु पहिले पारितोषिक जिंकले .दि . ११ ते १६ सप्टेंबर या दरम्यान मॉर्निंग ११ क्लब कडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेकरिता पहिले पारितोषिक २१००० रु श्री उमेश भालसिंग ,दुसरे पारितोषिक ११००० रु प्रा विक्रम काळे ,तिसरे पारितोषिक ७००० रु श्री गणेश खैरे ,चतुर्थ पारितोषिक ३००० रु श्री संभाजी शिंदे अशा मान्यवरांकडून पारितोषिकाचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेकरिता यु-ट्यूबद्वारे लाइव्ह प्रेक्षेपण देखील ठेवण्यात आले होते. राहाता ,पाथर्डी ,नगर ,नेवासा,कुकाणा,बीड ,पैठण ,शेवगाव या शहरातील संघानी येऊन या ठिकाणी सामने खेळले .
दि १६ सप्टें रोजी सेमी फायनल ,फायनल सामना यादिवशी खेळला यामध्ये पहिले पारितोषिक विनायक इलेव्हन शेवगाव या संघाने पटकविला तर दुसरे पारितोषिक अमरापूर संघ ,तिसरे पारितोषिक शिवमल्हार ग्रुप अहमदनगर ,चतुर्थ पारितोषिक मॉर्निंग ११ संघ फलकेवाडी यांनी पटकविले . सामनावीर महेश चव्हाण तर सलग ३ षटकार गौतम सुपारे ,सलग ३ गडी बाद हरी जायभाये व संतोष म्हस्के यांनी हा विक्रम केला . या सामन्यासाठी पंच म्हणून होडशील विजय ,वाजिदभाई होते .
बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमेश भालसिंग होते ते बोलताना म्हणाले कि ,युवा भविष्यकाळाचा वेध घेणारा असतो त्यांच्या कला गुणांना वाव हि समाजातून त्यांना मिळायला हवी . तसेच आपल्याला मिळालेले बक्षीस भविष्यासाठी प्रेरणादायी ठरते . खेळ हा तरुणाला व्यसनापासून दूर ठेवतो . हल्लीचे युग हे धावपळीचे आहे तसेच इलेक्ट्रॉनिक साधने करमणुकीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत .त्यामुळे अनेकजण मैदानावर खेळायला जाणेच विसरले आहेत . परंतु त्याचे दुष्परिणाम हि भोगावे लागत आहेत . त्यामुळेच सर्वागीण विकासासाठी मैदानी खेळ खूप गरजेचे आहेत . यानंतर गावातील निवृत्त प्राध्यापक बाबासाहेब फलके व शाम फलके यांच्या सहकार्यातून मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले .
या पारितोषिक वितरण समारंभाकरीता श्री उमेश भालसिंग जिल्हा उपाध्यक्ष युवामोर्चा भाजपा अ .नगर ,शेवगाव रोटरी क्लब अध्यक्ष बाळासाहेब चौधरी ,सरपंच बाळासाहेब मरकड ,विक्रम काळे ,बाबासाहेब फलके ,संभाजी शिंदे ,सुसे सर ,समीरभाई ,चंद्रकांत कुसारे ,गणेश खैरे ,मुन्ना खान टेनिसपटू ,अमजद पठाण ,दीपक कुसळकर ,महेश आहेर ,किशोर सोंडे ,सुनील ढमाले ,करण गायकवाड व मॉर्निग ११ संघ व फलकेवाडी ,अमरापूर ग्रामस्थ उपस्थित होते .