शेवगाव तालुक्यात जनावरे गेली वाहून : सुमारे ४० कुटुंबांना पाण्याचा वेढा;आखेगांव कोरडगांव भागात ढग फुटी सदृश परिस्थिती;नदी काठच्या वरुर भगुर लांडेवस्ती जोहरापुर या गावाना पुराचा वेढा

0
114

शेवगाव तालुक्यात जनावरे गेली वाहून : सुमारे ४० कुटुंबांना पाण्याचा वेढा;आखेगांव कोरडगांव भागात ढग फुटी सदृश परिस्थिती;नदी काठच्या वरुर भगुर लांडेवस्ती जोहरापुर या गावाना पुराचा वेढा

शेवगाव प्रतिनिधी – सुनील रणमले

शेवगांव पाथर्डी तालुक्यातील डोंगर भागात जोरदार पाऊस झाल्याने पावसाचे पाणी वेगात ओढे, नदी, नाल्यांत झेपावले. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ओढे, नदी, नाले दुधडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी काठी पूर स्थिती निर्माण झाली आहे.

पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील डोंगरभागांत काल झालेल्या पावसामुळे शेवगाव तालुक्यातील नद्यांना पूर आला आहे. आखेगाव, खरडगाव, वरूर, भगूर, वडुले, ठाकूर पिंपळगाव या गावांत पूर स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील नंदिनी, चांदणी, वटफळी या तीनही नद्यांना पूर आला आहे. नदी पात्रापासून सुमारे पाऊण किलोमीटर अंतर. या तीनही नद्यांचा संगम वरूर गावात होतो. नदीच्या पाण्याला वेग असल्याने नागरिकांचे प्राण संकटात आहे.पावसाचे पाणी अचानक आल्याने नदीकाठचे आखेगाव येथील २५ कुटूंब तर वरूर येथील म्हस्के वस्तीवरील काही कुटुंबे पाण्यामध्ये अडकले  आहेत. काहींची तर जनावरे वाहून गेली. ही सर्व कुटुंब भयभीत झाली आहेत.

शेवगावच्या तहसीलदार अर्चना भाकड-पागिरे यांनी पैठण येथून बोट आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर ठाकुर पिंपळगाव येथील नदीच्या पुलावरून चाललेली ट्रक पाण्यात बंद पडली आहे. त्यात एक जण अडकला आहे. सर्व पिके पाण्यात गेली असून घरांचे ही मोठे नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पाण्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी नदीकाठी राहु नये. उंच टेकडी व घरावरती जावून रहावे. पाण्यात अडकलेल्या जनावरांना मोकळे सोडून द्यावे. असे आवाहन शेवगांवच्या तहसीलदार सौ.अर्चना भाकड-पागिरे,यांनी केले आहे.पूरग्रस्त सुमारे दोनशे नागरिकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था महसुल प्रशासनाने तत्परतेने मदत पोहचविण्याचे काम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here