शेवगाव पाथर्डी तालुक्यातील युवक व युवतींसाठी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा ताई काकडे यांनी आयोजित केला युवा संवाद मेळावा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

अहमदनगर प्रतिनिधी – जिल्हा परिषद सदस्य हर्षदा ताई काकडे यांनी शेवगाव पाथर्डी तालुक्यातील युवक व युवतींसाठी युवा संवाद मेळावा आयोजित केला होता.

राजमाता जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं तस आजच्या ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या मुलांना घडवलं पाहिजे, स्वत:च्या पायावर उभं केलं पाहिजे. युवकांनो तुमच्यातील सुप्तगुण शोधा. मोठी स्वप्न पहा व ते सत्यात उतरवण्याकरिता त्याचा पाठलाग करा. नोकरी करून नोकर बनण्यापेक्षा व्यवसाय करून मालक बना असे प्रतिपादन मोटीव्हेशनल स्पिकर मा.प्रा.गणेश शिंदे यांनी शेवगाव येथे केले.

आज जनशक्ती विकास आघाडीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जनशक्ती युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड.डॉ.शिवाजीराव काकडे हे होते तर कार्यक्रमासाठी जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे, महाराष्ट्र उद्योजगता विकास केंद्र अ.नगरचे प्रकल्प अधिकारी, तात्यासाहेब जिवडे, पृथ्वीसिंग काकडे,जगन्नाथ गावडे, देवराव दारकुंडे, राजु जिजा, संजय आंधळे, अशोकराव ढाकणे, सुनील काकडे, लखन पातकळ,माणिक गर्जे, देविदास गीऱ्हे, अकबर शेख, विनोद मोहिते, रज्जाक शेख, वजीर पठाण, वैभव पूरनाळे, मनोज घोंगडे, आदि प्रमुख उपस्थितीत होते.

यावेळी पुढे बोलतांना प्रा.शिंदे म्हणाले की, युवकांनी सोशल मिडीयाचा वापर योग्यठिकाणी केला पाहिजे. आपण मोबाईलला नाही तर मोबाईल आपणास चालवतोय अशी परिस्थिती झाली आहे. आजचे तरूण-तरुणी अनुकरण प्रिय आहेत. दुसऱ्याचे अनुकरण करण्यात आपण वेळ वाया घालवतो. तुम्ही स्वतःतील वेगळेपण शोधा. आज व्यवसाय क्षेत्रात परप्रांतीय आढळतात, आणि आपली मुल नोकरीच्या रांगेत. त्यामुळे खर तर आज ही परिस्थिती बदलली पाहिजे.व्यवसाय करण्यासाठी हिम्मत लागते. ती स्वतःतच असते बाजारात विकत मिळत नाही. त्यामुळे आजच्या युवकांनी हिम्मत दाखवली पाहिजे. इतर फंद्यात पडण्यापेक्षा व्यवसायात पडा असे आव्हानही यावेळी त्यांनी युवकांना केले.

यावेळी कार्यक्रमासाठी म्हातारदेव आव्हाड, बाळासाहेब नरके, भाऊसाहेब सातपुते, भाऊसाहेब बर्डे, अशोक दातीर, शिवाजी कणसे, भारत लांडे, भगवान डावरे, अक्षय भोसले, बाबासाहेब फलके, निलेश वामन, बापूराव गाढे, कृष्णा सरोदे, दत्तात्रय आव्हाड, संदीप हिंगे, राजू मंचरे, भाऊसाहेब राजळे, बाबासाहेब मस्के, लखन फलके, विनोद पवार, बबन गायकवाड, बाबासाहेब देवढे सुरेश काजळे, भारत भालेराव, बाबासाहेब काळे यांच्यासह हजारो युवक व युवती कार्यक्रमास हजर होते. यावेळी आलेल्या हजारो युवक-युवतींचे स्वागत पृथ्वीसिंह काकडे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.डॉ.शिवाजीराव काकडे यांनी सूत्रसंचालन गोविंद वाणी यांनी तर आलेल्या हजारो युवक-युवतींशी यावेळी जि.प.सदस्या सौ.हर्षदा काकडे यांनी हितगुज साधले.

शेवगावला एम.आय.डी.सी. करून युवकांना व्यवसाय करण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी.अशा आशयाचे निवेदन तालुक्यातील युवकांनी जिल्हा उद्योग केंद्राचे महा.व्यवस्थापक अतुल दवंगे यांना यावेळी दिले.
- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!