मराठा सेवा संघ पदाधिकारी तसेच वरुर ग्रामस्थांना अर्वाच्च भाषेत दमदाटी प्रकरण
शेवगाव प्रतिनिधी – निकट फलके
शेवगाव तालुक्यातील वरुर गावातील विविध प्रश्नाकरिता सचिन म्हस्के सहसचिव – मराठा सेवा संघ हे शेवगाव पोलिस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करणार या विषयाचे निवेदन देण्याकरिता शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये गेले असता पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी अर्वाच्च भाषेत दमदाटी केली.याकरिता त्याच्यावर कारवाई करावी असे निवेदन मा उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांना दिले .
सविस्तर माहिती अशी आहे कि ,वरुर बु गावातील साचलेल्या घाण पाण्याचा तातडीने निपटारा करण्याकरिता तसेच विविध प्रश्नासंदर्भात मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व गावातील नागरिक हे कोरोना नियम पाळून ठिय्या आंदोलन दि २० ऑक्टोबर २०२१ रोजी करणार होतो.तसे निवेदन तहसीलदार ,गटविकासाधिकारी याना दिले होते.
आंदोलन करायचे म्हटल्यावर पोलिस स्टेशन कळवणे गरजेचे आहे याकरिता गावातील तरुण हे शेवगाव पोलिस स्टेशन गेले असता तेथिल ठाणे अंमलदार यांनी त्यांना पोलीस निरीक्षक यांच्याकडे घेऊन गेले.त्यांनी निवेदन न स्वीकारता तुम्ही ईथे निवेदन देण्यासाठी का आले ,तू कोण आहेस ,तू सरपंच आहेस का ,परत इकडे जर आलात तर तुमचे एक एकाचे थोबाड फोडीन ,दात पाडीन ,तुम्ही जर आंदोलन केले तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू असे अर्वाच्च भाषेत बोलून तरुणाचा अपमान करून ,निवेदन न स्वीकारताच त्यांना हाकलून दिले.
यावेळी कार्यालयामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक बागुल साहेब हे देखील उपस्थित होते.याबाबत तरुणांनी उपविभागीय पोलीस अधिकारी याना या गोष्टीची माहिती दिली.या वरील गोष्टीचा गांभीर्याने विचार करून शेवगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.अन्यथा दि.२५ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता मा पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे.
अशी माहिती श्री सचिन म्हस्के सहसचिव -मराठा सेवा संघ शेवगाव यांनी दिली . या निवेदनावर श्री विजयराव देशमुख अध्यक्ष मराठा सेवा संघ, श्री विष्णू घनवट तालुका उपाध्यक्ष मराठा सेवा संघ,देशमुख बळवंत शहराध्यक्ष मराठा सेवा संघ,निलेश बोरुडे संभाजी बिग्रेड, जिल्हा सचिव सचिन म्हस्के मराठा सेवा संघ ,श्री वैभव पुरनाळे सरपंच भगूर ,संतोष खांबट , दीपक खैरे ,रामेश्वर म्हस्के ,संदीप शेळके ,श्रीराम भुजबळ ,योगेश मोरे ,दीपक भुसारे ,संतोष खडके ,जालिंदर रेवडकर ,सोमनाथ रेवडकर,ज्ञानेश्वर तावरे,ज्ञानेश्वर म्हस्के,विकी खैरे,गणेश मोरे,मच्छिंद्र म्हस्के,देविदास डुकरे,आत्माराम म्हस्के,राजेंद्र वावरे आदी ग्रामस्थ यांच्या सह्या यावर होत्या .
जर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांची अशी मुस्कटदाबी होणार असेल आणी कायद्याचे रक्षक जर भक्षक होणार असतील तर जनसामान्यांनी कोणाकडे न्याय मागायचा – (सचिन म्हस्के सहसचिव -मराठा सेवा संघ)