शेवगाव पोलीसांची धडाकेबाज कारवाई एका संशयित आरोपींकडुन चोरीच्या तीन मोटार सायकल जप्त करुन आरोपी ताब्यात
◀️ दिनांक – ०४/०४/२०२४ रोजी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील चैतन्य कानिफनाथ मढी यात्रेतुन दुचाकी वाहनाची चोरी करुन ती दुचाकी वाहने शहरटाकळी ता. शेवगाव याठिकाणी आणल्याबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली होती. सदर माहीतीच्या अनुषंगाने तात्काळ पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांचे आदेशाने पोलीस पथके रवाना होवुन खात्री केली असता शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील शहरटाकळी येथील राहणारा इसम नामे वैभव लक्ष्मण हिवाळे वय २२ वर्षे रा. शहरटाकळी ता. शेवगाव याने चोरलेल्या मोटार सायकल बाबत विचारपुस केली असता त्याने त्याचे राहते घरी असलेल्या तीन मोटार सायकल तुम्ही माझ्या सोबत चला त्या मी चोरी केलेल्या मोटार सायकल देतो. असे सांगितले दिनांक ०५/०४/२०२४ रोजी रात्री ०३/०० वा चे सुमारास सदर ठिकाणी गेलो असता त्याठिकाणी २ हिरो स्प्लेंडर व १ एच एफ डिलक्स अशा तीन मोटार सायकल सदर ठिकाणी दिसल्या. आम्ही त्या मोटार सायकल व आरोपी यास शेवगाव पोलीस स्टेशन याठिकाणी आलो. सदर आरोपीकडे विचारपुस केली की तु या मोटार सायकल कोठुन आणल्या आहेत. तेव्हा त्याने सांगितले की, चैतन्य कानिफनाथ मढी यात्रा व सोनई याठिकाणावरुन या मोटार सायकल चोरुन आणल्या आहेत.
त्यानंतर आम्ही पाथर्डी व सोनई पोलीस स्टेशन यांचेकडे संपर्क केला असता त्या मोटार सायकल चोरी झाल्याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनला गु. रजि. नं. ३३८/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाने व सोनई पोलीस स्टेशन गु.रजि.नं.१४९/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला होता. आम्ही तात्काळ त्यांना बोलावून आरोपी नामे वैभव लक्ष्मण हिवाळे वय २२ वर्षे रा. शहरटाकळी ता. शेवगाव व सदर मोटार सायकल त्यांच्या ताब्यात देण्यात आलेल्या आहेत. पुढील तपास पाथर्डी व सोनई पोलीस स्टेशन करत आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला सो.अ.नगर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री प्रशांत खैरे अ.नगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल पाटील सो उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री दिगंबर भदाणे, पोहेकाँ किशोर काळे, पोना उमेश गायकवाड, पोना संदिप आव्हाड, पोकों शाम गुंजाळ, पोकों बप्पासाहेब धाकतोडे, पोकों कृष्णा मोरे, पोकों संपत खेडकर, पोकों संतोष वाघ यांनी केली असुन पुढील तपास पाथर्डी व सोनई पोलीस स्टेशन हे करत आहेत. मोटार सायकल मालकांना त्यांच्या मोटार सायकल मिळून आल्याने त्यांनी पोलीसांचे अभिनंदन करुन कौतुक केले आहे