शेवगाव व पाथर्डी च्या पाण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व मुळा पाटबंधारे कार्यकारी अभियंता यांना निवेदन. 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

शेवगाव व पाथर्डी च्या पाण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व मुळा पाटबंधारे कार्यकारी अभियंता यांना निवेदन.                                                                   

शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना मुळा उजवा कालव्याच्या आवर्तनातून तलाव व बंधारे भरून देण्यात यावे- चंद्रशेखर घुले.  

                                             

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील मुळा लाभ क्षेत्रातील गावातील पिण्याच्या पाण्याचे तलाव व बंधारे भरून देण्यात यावे व मुळा धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून गेल्या वर्षी पाऊस अतिअल्प झाल्यामुळे शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील पिकाची दैनीय अवस्था झाली होती. सध्याच्या परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याचे उद्भव कोरडे पडलया मुळे लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. व जनावरांचा चारा देखील वाळू लागला आहे.

त्यामुळे चालू उन्हाळी आवर्तनातून शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील टेलच्या भागातील शेतकऱ्यांना उभ्या पिकासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी पूर्ण दाबाने पाणी द्यावे व पाणी राखीव न ठेवता पूर्ण क्षमतेने सिंचन करून तलाव, बंधारे, पिण्याच्या पाणी साठी भरून द्यावे जेणेकरून शासनाचा टँकरचा खर्च वाचेल या विविध मागण्यांसाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव व पाथर्डीच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमट व मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी आमदार चंद्रशेखर घुले समवेत राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, राजेंद्र देशमुख, अंबादास कळमकर, सुधाकर लांडे, शहादेव खोसे, अशोक मेरड, विक्रम लोढे, राजेंद्र आढाव, रोहन साबळे, माणिकराव बुधवंत, उदय बुधवंत, जय बुधवंत, राहूल बेडके, बबन जाधव, अनंत सावंत, जगन्नाथ साबळे, गणेश खंबरे, अजय साबळे, लक्ष्मण नांगरे, चंद्रकांत निकम, गंगाधर भोसले, तुकाराम मुळे, संजय मराठे, लक्ष्मण नगरे आदी उपस्थित होते.

पुढे निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव पाथर्डी तालुक्यातील गावे मुळा उजवा कालवा शाखा कालवा क्र. २ अंतिम वितरिका व पाथर्डी शाखा कालवा यांच्या अंतिम लाभ क्षेत्रात येतात या कालव्यावरील पाणी वापर संस्था हा अंतिम भागात आहे. या सर्व संस्था सक्षमपणे काम करत आहे. सन २०२३- २४ मध्ये अत्यल्प पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती असून परिसरातील विहिरी, कुंपणलिका यांना पाणी राहिले नाही. शेतकऱ्यांची पिके सर्वस्वी कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे.

या सर्व संस्थांना पूर्ण दाबाने व मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात यावा जेणेकरून कुठल्याही शेतकऱ्यांचे पीक पाण्यापासून वंचित राहणार नाही व सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पाणी वापर संस्था चे पदाधिकाऱ्यांशी संवाद ठेवावा व त्यांच्याशी विचार विनिमय करून मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करावा तसेच अंतिम भागाकडून सिंचन करण्यात यावे आश्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात यावे व लाभ क्षेत्रातील सर्व गावात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली असुन प्रत्येक गावातील ग्रामस्थ, वाड्या, वस्त्यावरील रहिवाशी टँकर मार्फत पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी करत असुन परिसरात मोठ्या प्रमाणात पशुधन असून या पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून पशुधन बचावण्यासाठी शेतकरी जिवापाड प्रयत्न करत आहे. लाभक्षेत्रातील नैसर्गिक प्रवाहवर छोटे-मोठे बंधारे व पाणी पुरवठे आहेत या सर्व बंधाऱ्यात व पाणीपुरवठ्याचे ठिकाणी कालव्याचे पाणी देण्यात यावे जेणेकरून पिण्याच्या पाण्याची व पशुधनाच्या पिण्याचे पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे…

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -
- Advertisement -

Latest Articles

error: Content is protected !!