शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आत्मविश्‍वास देण्याचे काम सुरु -आ. संग्राम जगताप

- Advertisement -

शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आत्मविश्‍वास देण्याचे काम सुरु – आ. संग्राम जगताप

फुले ब्रिगेडच्या वतीने भुतकरवाडीच्या महापालिकेतील शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

नवीन स्कूल बॅगने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले समाधानाचे हास्य

अहमदनगर (प्रतिनिधी) – गरजू घटकातील विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे दर्जेदार शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन शिक्षणासाठी त्यांना आत्मविश्‍वास देण्याचे काम करण्यात आले आहे. श्रमिक, कष्टकरी वर्गातील मुलांना शिक्षणासाठी आधार दिल्यास त्यांच्या मनातील नैराश्‍याची भावना हटणार असून, फुले ब्रिगेडच्या माध्यमातून राबविण्यात आलेला उपक्रम दिशादर्शक व इतरांना प्रोत्साहन देणारा असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

फुले ब्रिगेडच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भुतकरवाडी येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेवक दगडू (मामा) पवार, स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे, प्रा. माणिक विधाते, फुले ब्रिगेडचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक खेडकर, भीमाशंकर लांडे, अनिल तेजी, मयूर बांगरे, प्रशांत धाडगे, स्वप्निल बोरुडे, संजय सत्रे, वैभव ढाकणे, वाणी, संजय भुतकर, बंटी तापकिरे, संकेत ताठे, राहुल चाटे, निलेश सत्रे, यश लिगडे, प्रवीण घावरी, सचिन पवार, राहुल कवडे, गणेश ताठे, स्वप्निल राऊत, भैय्या पवार, मळू गाळकर, ऋषी ताठे, नाना भळगट, बंटी पवार, किरण मेहत्रे, योगेश अजबे, रोहित भगत, आशिष भगत, निखिल ताठे, अक्षय भगत, किरण जावळे, सौरभ जरे, आकाश औटी, संतोष उंडे, विजय सुंबे आदी उपस्थित होते.

पुढे आमदार जगताप म्हणाले की, महापालिकेच्या या शाळेला चांगले रुप देण्याचे काम केले जाणार आहे. लोकवस्तीत असलेल्या या शाळेत सर्वसामान्य कष्टकरींची मुले शिक्षण घेत असून, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. शिक्षणातून त्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याचे बळ निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संपत बारस्कर म्हणाले की, शहरात मागील पंधरा ते वीस दिवसापासून आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. विशेषत: गरजू विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याची मदत उपलब्ध करुन देण्यात आली. शहरात मोठे समाजकार्य कार्यकर्त्यांनी उभे करुन गरजूंना आधार देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दगडू (मामा) पवार यांनी महापालिकेच्या शाळेत गरजू घटकातील विद्यार्थी शिक्षण घेत आहे. त्यांना शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्यातून देण्यात आलेले प्रोत्साहन कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. माणिक विधाते म्हणाले की, मनपाच्या शाळेत गरजू घटकातील मुलांना घडविण्याचे कार्य सुरु आहे. स्पर्धेच्या युगात या  विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकण्यासाठी आधार मिळण्याची गरज आहे. फुले ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांना आधार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. फुले ब्रिगेडचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक खेडकर यांनी मनपाच्या शाळेत येणारे विद्यार्थी हे जुने स्कूल बॅग अथवा पिशवीत आपले शैक्षणिक साहित्य घेऊन येते होते. ही परिस्थिती पाहून फुले ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांना नवीन स्कूल बॅगची भेट देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पाहुण्यांचे स्वागत ज्योती टाळके व भिमाशंकर लांडे यांनी केले. नवीन स्कूल बॅग मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक अरुण पवार यांनी केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles