युवकांनी सामाजिक कार्याकडे वळावे – पद्मश्री पोपटराव पवार
अहमदनगर प्रतिनिधी – समाजामध्ये आपण वावरत असताना समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याच भावनेतून प्रत्येकाने काम करावे.संस्था,संघटना, मित्र मंडळाने पुढे येऊन सामाजिक बांधिलकी जोपासावी, समाजामध्ये विविध प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडविण्यासाठी युवकांनी सामाजिक कार्याकडे वळावे.
शैनेश्वर प्रतिष्ठानने वाडिया पार्क येथे मागील वर्षी वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्याचे काम केले आहे हे पाहून मनाला आनंद झाला.
पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येकांनी काम करावे, निस्वार्थ भावनेने समाजामध्ये केलेले काम मनाला आनंद देणारे असते असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.
शैनेश्वर प्रतिष्ठान व लोकमान्य टिळक मित्र मंडळाच्या वतीने पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा सत्कार करताना राजेंद्र उदागे,गोरख पडोळे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता गाडकर,सतीष पठारे,ज्ञानेश्वर पठारे,रमाकांत पाडळे, पोपटराव निमसे,राजेंद्र ऐकाडे,विजय पगारे,संदीप जाधव,प्रदीप कुसाळकर, सुमित फुलडहाळे,सचिन दळवी, दीपक काळे,बबनराव बनकर,श्री.गार्डे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजेंद्र उदागे म्हणाले की,पद्मश्री पोपटराव पवार यांचे कार्य आजच्या युवकांना दिशादर्शक व प्रेरणादायी आहे.त्यांनी केलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे.
हिवरे बाजार गावातील ग्रामस्थांना एकत्रित करून गावाचा विकासातून त्यांनी कायापालट केला.हिवरे बाजारचे आदर्श गावाचे मॉडेल देशासमोर त्यांनी उभे केले. देशातील विविध गावे त्यांच्या गावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करत आहे.
त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अहमदनगर शहरांमध्ये शैनेश्वर प्रतिष्ठान वर्षभर पर्यावरण पूरक सामाजिक उपक्रम राबवत असतो असे ते म्हणाले.