कर्जत प्रतिनिधी – येथील स्टार अकॅडेमी,कर्जत चा विद्यार्थी श्रीकांत अजिनाथ आढाव,याची नुकत्याच झालेल्या JEE ADVANCE, परीक्षेमधून IIT प्रवेशासाठी निवड झाली आहे.श्री.रविशंकर विद्यामंदीरामध्ये त्याचे इ.४ थी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे.
त्याच्या या अभूतपूर्व व नेत्रदिपक यशाबद्दल स्टार अकॅडेमी,कर्जतचे संचालक व श्री रविशंकर विद्यामंदिराचे प्रमुख कार्यवाह श्री.र.ल. तथा नंदकुमार लांगोरे यांनी अभिनंदन करून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कर्जतमध्ये राहून कर्जतमध्येच अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात मोठे यश मिळविणारा तालुक्यातील हा पहिला व एकमेव विद्यार्थी असावा,असे आपल्या अभिनंदनपर मनोगतातून श्री. लांगोरे यांनी व्यक्त केले. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.पांडुरंग शेळके, उपाध्यक्ष संभाजीराव लांगोरे व सर्व संचालक मंडळाकडून अभिनंद करण्यात आले.
या प्रसंगी प्राचार्य मोहन शिनगारे,मुख्याध्यापिका सविता बळे,स्टार अकॅडेमीचे व्यवस्थापक स्वप्निल मराळ व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.